BJP : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी भाजपचा बी प्लान, ईडीचा दबाव टाकून प्लान तयार; कुणी केला दावा?
वीर सावरकर हे आदरणीय आहेत. पण त्यांच्या नावाने राजकारण सुरू आहे. आज हा पक्ष बोलतो, उद्या तो पक्ष बोलतोय अशा या गोष्टीवर राजकारण बिलकूल करण्यात येऊ नये, असं कळकळीचं आवाहनही त्यांनी केलं.
मुंबई : सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठा दावा केला आहे. दमानिया यांच्या दाव्यानुसार अजित पवार हे भाजपसोबत जाणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्याभोवती संशयाचं वलय निर्माण झालं आहे. अंजली दमानिया यांच्यामते, शिंदे गटाचे 15 आमदार बाद झाल्यावर भाजपने बी प्लान तयार केला आहे. या प्लॅननुसार भाजपवाले अजित पवार यांच्याशी संसार थाटणार आहेत. ईडीचा दबाव टाकून हा प्लान तयार करण्यात आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अंजली दमानिया यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा दावा केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधी भाजपचा बी प्लान तयार आहे. शिंदे गटाचे 15 आमदार योग्य ठरले तर शिंदे गटाबरोबरच संसार थाटायचा. नाही तर बी प्लान बाहेर काढायचा. या प्लाननुसार अजित पवार यांना घेऊन भाजप संसार थाटेल. अजित पवार यांच्यासोबत आमदारांनी यावं म्हणून ईडीचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे. मंत्रालयात माझे अनेकजण परिचयाचे आहेत. त्यांच्याशी बोलत होते, त्यावेळेस प्रत्येकांच हेच मत होतं की अजित पवार हे भाजपसोबत आहेत. कधीही ते भाजपसोबत जातील. मला त्याचं आश्चर्य वाटलं, पण जेव्हा अजित दादांची भाजपच्या सपोर्टमधील स्टेटमेंट ऐकली. तेव्हा मला हे बरोबर वाटायला लागलं, असं त्या म्हणाल्या.
काल मी मंत्रालयात गेले होते. तिथे मला एका व्यक्ती भेटला. त्याने माझ्याशी संवाद साधला. 15 आमदार लवकरच बाद होणार आहेत. हे आमदार बाद झाल्यावर अजित पवार फडणवीस यांच्यासोबत जाणार आहेत. राजकारण कुठल्या स्तराला जाईल हे सांगता येत नाही, असं सांगतानाच कोर्टाचा काहीही निर्णय येऊ शकतो. त्यामुळे भाजपचा हा बी प्लान तयार आहे. जर हे 15 आमदार योग्य ठरले, बाद झाले नाही तर शिंदे गटाबरोबरच आपला संसार थाटायचा आणि जर ते बाद झाले तर प्लॅन बी तयार असायला हवा म्हणून हा प्रयत्न केलेला दिसतोय. त्यांना ED चा जो दबाव आण्याचा प्रयत्न केलाय तो त्याच्यासाठीच केलेला आहे, असंही त्या म्हणाल्या.
भाजपकडे वळताना दिसत आहेत
शरद पवार यांचे अदानीची बाजू घेणं, अजित पवार यांनी ईव्हीएमची भलामण करणं यातून हे लोक महाविकास आघाडीपासून लांब होताना दिसत आहेत. त्यांचा कल थोडा भाजपकडे वळताना दिसत आहे, असा दावाही त्यांनी केला.
ईडीचा गैरवापर सुरू
प्रत्येक वेळेला जो प्रेशर म्हणजे दबाव आणतो असं दाखवायचं आणि तुम्ही आम्हाला जॉईंट व्हा नाहीतर तुम्हाला अटक होणार अशी स्थिती भाजप पुन्हा पुन्हा करता आहे. ईडीचा सर्रास गैरवापर होत आहे. आधी काँग्रेसने केला, आता भाजप करते आहे. उद्या इतर कुठला ही पक्ष आला तो करेल. हे राजकारण अतिशय गलिच्छ झालं आहे, अशी टीका त्यांनी केली.
नाव वगळण्यात का आलं?
अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जरंडेश्वर प्रकरणात ईडीने क्लीनचीट दिली. ईडीने चौकशी केलेल्या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीत 2004 ते 2008मध्ये सुनेत्रा पवार डायरेक्टर होत्या. 2017-18मधील पत्रकार परिषदेत मी याबाबत माहिती दिली होती. जगदीश कदम, अजय कांगरालकर, राजेंद्र घाडगे, गजानन पाटकर या सर्वांचा मी उल्लेख केला होता. हे सर्व लोक त्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत आणि असं असताना सुनेत्रा पवार कंपनीच्या माजी डायरेक्टर असताना चार्टशीटमधून अजित पवार आणि सुनेत्रा पवार याच नाव वगळण्यात का आलं? असा सवाल त्यांनी केला.