हैदराबादमध्ये भाजपा वाढली, केरळलाही, मुंबईतही सेनेला टक्कर?

केरळमध्ये भाजपनेही 2015 च्या निवडणुकीपेक्षा चांगलं प्रदर्शन दाखवलं आहे. भाजप 14 ग्रामपंचायत आणि पल्लकड नगर पालिकेत विजय मिळवल्याचं पाहायला मिळत आहे.

हैदराबादमध्ये भाजपा वाढली, केरळलाही, मुंबईतही सेनेला टक्कर?
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:56 PM

मुंबई: हैदराबादनंतर केरळच्या स्थानिक निवडणुकांमध्येही भाजपनं चांगलं प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळत आहे. केरळमध्ये 3 टप्प्यात 1 हजार 199 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार पडली. त्यात लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने पुन्हा एकदा एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर भाजपनेही 2015च्या तुलनेत चांगलं प्रदर्शन केलं आहे. दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर LDFने आपला पाया मजबूत केला आहे. (BJP’s good performance in Kerala local elections, now focus on BMC)

केरळमध्ये पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 941 ग्रामपंचायत, 152 ब्लॉक पंचायत, 86 नगर पालिका आणि 14 जिल्हा परिषदांचा समावेश आहे. त्यात 514 ग्रामपंचायतींमध्ये LDF पुढे आहे. 14 जिल्हा परिषदांपैकी 10 तर 152 ब्लॉक पंचायंतींपैकी 108 जागांवर LDF पुढे आहे.

भाजपचं 2015 पेक्षा चांगलं प्रदर्शन

काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधी पक्ष असलेल्या UDFने 375 ग्रामपंचायत, 44 ब्लॉक पंचायत 45 नगर पालिका आणि 3 जिल्हा परिषदांमध्ये आघाडी मिळवली आहे. तर भाजपनेही 2015 च्या निवडणुकीपेक्षा चांगलं प्रदर्शन दाखवलं आहे. भाजप 14 ग्रामपंचायत आणि पल्लकड नगर पालिकेत विजय मिळवल्याचं पाहायला मिळत आहे.

हैदराबादेतही भाजपची दमदार कामगिरी

हैदराबात महापालिका निवडणुकीतही भाजपनं दमदार प्रदर्शन करत असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM ला जोरदार धक्का दिला आहे. ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या (GHMC) 150 जागांपैकी तेलंगणा राष्ट्र समिती 56, भाजप 48, एमआयएम 44 , काँग्रेसने 2 जागा मिळवल्या आहेत. गेल्या निवडणुकीत 4 जागा मिळवलेल्या भाजपनं यंदा 48 जागांपर्यंत मजल मारली आहे.

आता भाजपचं मिशन मुंबई!

हैदराबाद आणि केरळच्या स्थानिक निवडणुकीत भाजपनं जोरदार प्रदर्शन केल्यानंतर आता भाजपचं मिशन मुंबई सुरु झालं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच भाजपनं ही मोहीम सुरु केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसा मनसुबा बोलूनही दाखवला आहे. 2022 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. मात्र, आतापासूनच भाजप तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. त्याचं उट्टं काढण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी अस्तित्वाचा विषय आहे. मुंबई महापालिकेत गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यात एकूण 227 वॉर्डांपैकी शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे 84 जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. महत्वाची बाब म्हणजे या आधीच्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या फक्त 31 जागा होत्या.

दुसरीकडे राज्यात सत्तेत असलेली महाविकास आघाडी मुंबई महापालिका निवडणुकीतही दिसणार का? हे पाहणं महत्वाचं असेल. कारण, त्यावरुनच मुंबई महापालिकेचं गणित अवलंबून असणार आहे.

अतुल भातखळकरांकडे जबाबदारी 

फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने, प्रभारी म्हणून कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची निवड केली आहे. “आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढणार असल्याचे भाजपने जाहीर केलेले आहे. अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत पक्षाला घसघशीत विजय मिळवून देण्याचे आव्हान आमच्यासमोर असेल. त्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संघटनेला सज्ज करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू”, असा निर्धार भातखळकरांनी केला आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल 

  • शिवसेना – 92
  • भाजप – 82
  • काँग्रेस – 30
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 9
  • समाजवादी पक्ष– 6
  • एमआयएम – 2
  • मनसे – 1
  • अभासे – 1
  • एकूण – 227

संबंधित बातम्या:

‘हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे’, ओवेसींचा गड असलेल्या हैदराबादेत योगी आदित्यनाथांची गर्जना

 ठाकरे सरकारचा माज उतरवणार; मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवणार, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार  

BJP’s good performance in Kerala local elections, now focus on BMC

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.