मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सज्ज होणार, प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड सेंटरचीही उभारणी

मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये एक कोव्हिड सेंटर आणि एक क्वारंटाईन सेंटर उभारले जाणार आहे. (Suresh Kakani Jumbo Covid Center)

मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सज्ज होणार, प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड सेंटरचीही उभारणी
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 7:14 PM

मुंबई : “गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सज्ज होणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तसेच मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये एक कोव्हिड सेंटर आणि एक क्वारंटाईन सेंटर उभारले जाणार आहे,” असेही ते म्हणाले. (BMC Additional Municipal Commissioner Suresh Kakani Corona Jumbo Covid Center)

“मुंबईत सध्या तरी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण नाहीत. याआधी युके स्ट्रेनचे रुग्ण आढळले होते. पण सध्या ते देखील बरे झाले आहेत. मात्र, आणखी नव्या स्ट्रेनचे रुग्ण मुंबईत अद्याप आढळलेले नाहीत. खबरदारी म्हणून 90 रुग्णांचे सॅम्पल पुण्यात तपासणीसाठी पाठवले आहेत,” असे काकाणी यांनी सांगितले.

“कोविन अॅपच्या तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणाचा वेग मंदावत आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी राज्य आणि केंद्र शासनाला कळवलं आहे. लवकरच राज्य शासनही कोविन अॅपमधील अडचणींसंदर्भात केंद्र सरकारशी संपर्क साधून यावर तोडगा काढेल,” असेही काकाणी म्हणाले.

तपासणी पथक अचानक जाऊन कारवाई करणार 

“मुंबईतील ओव्हल मैदानात गर्दी होत होती. या नियमांचं पालन करणंही कठीण होतं. त्या ठिकाणच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन ओव्हल मैदान बंद करण्यात आले आहे. इतर मैदान आणि सार्वजनिक जागांबाबत त्या ठिकाणचे वॉर्ड ऑफिसर परिस्थिती बघून निर्णय घेतील.

तसेच लग्नातील व्हिडीओ शुटींगही तपासले जाईल. लग्नकार्य, समारंभांवर अचानक धाड टाकून होणार कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये होणारे कार्यक्रम, कधी , कोणत्या दिवशी आहे याची दररोज यादी तयार करेल. वॉर्ड ऑफिसरचे तपासणी पथक अचानक जाऊन कारवाई करु शकेल. तसंच, लग्नातील व्हिडीओ शुटींगही तपासले जाईल,” असेही ते म्हणाले.

“खाजगी कार्यालयांमध्ये 50 टक्के स्टाफ कार्यरत असावा या आदेशाचा पुर्नरुच्चार यावेळी त्यांनी केला. खाजगी कार्यालयांना देखिल आकस्मिक भेटी देऊन कर्मचारी किती संख्येनं काम करतायेत, नियमांचं पालन होतंय का याची पहाणी केली जाईल,” असेही त्यांनी सांगितले. (BMC Additional Municipal Commissioner Suresh Kakani Corona Jumbo Covid Center)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी ! राज्यातली पहिली प्रवेशबंदी, परभणीमध्ये 11 जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी

वाशिममध्ये कोरोनाचा स्फोट, 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

PHOTO : कोरोना लस सुरक्षित, सुरेश काकाणींकडून लस टोचून घेतल्यानंतर आवाहन

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.