BMC Budget 2021 updates live मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2021) आज जाहीर होत आहे. कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर BMC Budget कडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मुंबई महापालिकेनं यंदा 39 हजार 038 कोटींचं बजेट जाहीर केलं. मागील वर्षी बजेट 33 हजार 441 कोटी होतं, यंदा 16.74 टक्केने बजेट वाढवलं.
महापालिकेत सर्वात आधी शिक्षण विभागाचं बजेट सादर करण्यात आलं. शिक्षण विभागाचे 2945 कोटींचं बजेट जाहीर झालं. यावेळी मुंबई महापालिकेच्या शाळांचं नामांतर करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. आता मुंबई महापालिकेच्या शाळा मुंबई पल्बिक स्कूल नावने ओळखल्या जातील.
मुंबई महापालिकेचा 2021 आणि 2022 चा अर्थसंकल्प आयुक्त इकबाल चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. यंदा महसुली उत्पन्न 5876 कोटीने कमी झालं, कोविड संकटाचा महापालिकेच्या महसुली उत्पनावर मोठा परिणाम दिसून आला. पालिकेचे एकूण महसूली उत्पन्न ५८७६.१७ कोटींनी घटले.
सेवा शुल्कांमध्ये सुधारणा
तिजोरीला लागलेली गळती रोखण्यासाठी महापालिका सेवा शुल्कांमध्ये सुधरणा करणार, वेगवेगळ्या सेवांचं शुल्क निश्चित करण्यासाठी सुल्क सुधारणा प्राधिकरण नियुक्त करणार
बेस्टला मदत
बेस्टला यंदा ७५० कोटी रूपयांची मदत महापालिका करणार
उत्पन्नाचे नवे स्त्रोत
तिजोरीला लागलेली गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या उत्पन्नाचे नवे स्त्रोत, नवीन इमारतींना परवानगी देताना आकारण्यात येणा-या छाननी शुल्कात वाढ होणार, छाननी शुल्क एफएसआयवर न आकारता इमारतीच्या बाजारभावानुसार असलेल्या किंमतीवर आकारले जाणार
नवीन इमारतींच्या बांधकामानंतर अग्नी आणि जीव संरक्षण उपाययोजनांची पाहणी आणि परवानगी मुंबई महापालिका देते. या शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे. वर्षात 140 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहेत. विविध सेवा शुल्क सुधारणा केल्या जाणार
कोव्हिड योद्ध्यांना मदत
निधन झलेल्या कोविड योध्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख सानुग्रह सहाय्य देणार
सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रमुख रुग्णालयांमधील यंत्रसामुग्री करण्यासाठी 96 कोटींची तरतूद
सायन, केईएम नायर रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधेसाठी 8 ते 10 कोटी खर्च
क्षयरोग, एड्स, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो यासाठी 2030 पर्यंत 100 टक्के लसीकरण
कोविड कळात कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 300 रु भत्ता देण्यात आला. 31 डिसेंबर 2020 पर्यंत 417 कोटी खर्च आला
ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, दिव्यांग यासंख्या व्यक्तींना घरातच आरोग्य सेवा देण्यासाठी ओपीडी ऑन व्हील योजनेअंतर्गत शहर, पूर्व, पशचिम उपनगरांमध्ये मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देणार
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक चाचण्या घरातच करण्यासाठी युनानी, आयुर्वेद औषधपद्धतीचा वापर करणार
यासाठी 5 कोटींची तरतूद
सार्वजनिक वाहतुकीचे महत्व लक्षात घेता या अर्थसंकल्पात 750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रम
संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी कस्तुरबा रुग्णालयाची क्षमता वाढावण्यासाठी नवीन इमारत बांधान्यासाठी निविदा प्रस्तावित
अग्निशमन दल
अग्निशमन सेवा शुल्क इमारतीच्या क्षेत्रफळावर आधारित अग्निशमन सेवा शुल्क लागू केले जाणार आहे. इमारतीला परवानगी देतेवेळी हे शुल्क लागू केले जाणार आहे.या प्रस्तावाला महापालिका आणि राज्य सरकारची परवानगी मिळालेली आहे. परंतु अजून अधिसूचना जारी झालेली नाही. महापालिकेला त्यातून 20 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
मुंबई महापालिका शिक्षण अर्थसंकल्प (BMC Education Budget)
शिक्षण विभागाच्या बजेट कोणत्याही मोठ्या घोषणा नाहीत , जुन्याच योजनांना पुन्हा तरतूद करण्यात आलीय
मुंबईकरांवर कराचा बोजा नाही, महापालिकेचा 33 हजार 441 कोटींचा अर्थसंकल्प सादर
(BMC Budget 2021 updates live: : Brihanmumbai Municipal Corporation budget Key highlights shiv sena bjp maha vikas aaghadi )