मुंबई पालिकेकडून क्वारंटाईन नियमावलीत मोठा बदल, 50 वर्षांवरील कोरोनाबाधितांना कोव्हिड सेंटरमध्ये राहाणं बंधनकारक
पालिकेने क्वारंटाईनचे नियम बदलले असून 50 वर्षे आणि त्या पुढील वयाच्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी विलगीकरणात राहता येणार नाही.
मुंबई : मुंबई पालिकेने कोरोना रुग्णांच्या क्वारंटाईन नियमावलीत मोठा बदल केला आहे (BMC Change Quarantine Rules). आता पालिकेने क्वारंटाईनचे नियम बदलले असून 50 वर्षे आणि त्या पुढील वयाच्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी विलगीकरणात राहता येणार नाही. लक्षणं नसली तरी 50 वर्षांवरील कोरोनाबाधित नागरिकांना कोव्हिड सेंटरमध्ये राहावं लागणार आहे. पोलिकेकडून गृह विलगीकरण सुचनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे (BMC Change Quarantine Rules).
कोव्हिड बाधित रुग्णांतील 50 ते 60 वर्ष वयोगटामध्ये मृत्युचे प्रमाण इतर वयोगटाच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळल्यानंतर, त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने, गृह विलगीकरण (home isolation) बाबतच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांसह अतिरिक्त सूचना म्हणून त्यांचे महानगरपालिका प्रशासनाकडून पालन/अंमलबजावणी केली जाणार आहे.
मुंबईतील सध्याच्या गृह विलगीकरण मार्गदर्शक सुचनांनुसार, ज्या कोव्हिड रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत किंवा सौम्य लक्षणं असतील, ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि इतर कोणतेही दीर्घकालीन आजार नसतील आणि स्वतंत्र प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध असेल, अशा रुग्णांचे गृह विलगीकरण करण्यात येत होते (BMC Change Quarantine Rules).
मात्र, कोव्हिड-19 विषयक सांख्यिकी विश्लेषणातून असे निदर्शनास आले आहे की, वय वर्ष 50 ते 60 या वयोगटामध्ये मृत्युंचे प्रमाण अधिक आहे. मुंबईमध्ये मृत्यू दर कमी करण्यासाठी, भारत सरकारने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त, पुढीलप्रमाणे अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
लक्षणं नसलेले कोव्हिड बाधित, ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि त्यांना दीर्घकालीन स्वरुपाचे आजार असतील, तर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्य हिताच्या दृष्टिने त्यांनी गृह विलगीकरणात राहण्यासाठी आग्रह धरु नये, असे त्यांना समजावून सांगण्यात येईल. अशा रुग्णांना कोरोना काळजी केंद्र-2/ समर्पित कोरोना आरोग्य केंद्र/ शासकीय किंवा खासगी समर्पित कोरोना रुग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या गरजेनुसार दाखल करण्यात येईल. याव्यतिरिक्त, लक्षणं नसलेल्या कोव्हिड बाधितांना दीर्घकालीन आजार नसल्यास, त्यांना गृह विलगीकरणाचा पर्याय देण्यात येईल.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, एखाद्या गृहनिर्माण संस्थेमध्ये रुग्ण आढळून आल्यास, घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून किमान एकदा निर्जंतुकीकरण करण्यात येईल. तसेच, संबंधित कोव्हिड बाधित रुग्णाचे घर आणि सामुदायिक वापराच्या जागांचेही निर्जंतुकीकरण करण्यात येईल.
लोकांना मदत करताना कोरोना, पीपीई किट घालून एकनाथ शिंदे फ्रंटलाईन शिवसैनिकांच्या भेटीलाhttps://t.co/JJ08X34nG6#Shivsena #EknathShinde #Corona@mieknathshinde @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 21, 2020
BMC Change Quarantine Rules
संबंधित बातम्या :
मुंबईतील खासगी रुग्णालयांसह नर्सिंग होम कोरोनामुक्त, 70 रुग्णालयात पावसाळी आजारांवर उपचार