मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. याप्रकरणातील सर्व पुरावे मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी प्रतिक्रिया दिली आहे (BMC commissioner Eqbal Chahal on Sushant case).
“या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक मुंबईत सात दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी आलं तर त्यांना क्वारंटाईन केलं जाणार नाही. मात्र, सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी सीबीआयचे अधिकारी मुंबईत येतील तर त्यांना मुंबई महापालिकेला ईमेल करुन क्वारंटाईनमधून सूट मिळवण्यासाठी अर्ज कारावा लागेल. त्यानंतर आम्ही त्यांची क्वारंटाईन पीरियडमधून सूट देऊ”, असं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल म्हणाले आहेत (BMC commissioner Eqbal Chahal on Sushant case).
If CBI team comes for 7 days they’ll be automatically exempted from quarantine if carrying confirmed return ticket, as per MCGM’s existing quarantine guidelines. If they come for more than 7 days they’ve to apply for exemption via our email id, we’ll exempt them: BMC Commissioner https://t.co/gwjux3EwSq
— ANI (@ANI) August 19, 2020
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत केलं आहे. मुंबई पोलीस सीबीआयच्या तपासाला सहकार्य करेल, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. “सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात कोणताही दोष आढळलेला नाही. मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिला आहे.
We welcome judgement of Supreme Court and we will provide whatever cooperation is needed by the CBI. It is a matter of pride for Mumbai Police that Supreme Court observed there is no fault found in their investigation: Maharashtra Home Minister Anil Deshmukh#SushantSinghRajput pic.twitter.com/sDo8PW8dGJ
— ANI (@ANI) August 19, 2020
सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवली. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे कोर्टाने मान्य केले. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता.
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. “सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळताना कोर्टाने हा आदेश दिला. ही एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करुन बिहार पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे. (Home Minister Anil Deshmukh On CBI For Sushant Singh Rajput)
संबंधित बातम्या :
मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे