Mumbai Model | काय आहे ‘मुंबई मॉडेल’, ज्याची सुप्रीम कोर्टानं स्तुती केली, केंद्राला दिल्लीसाठी राबवायला सांगितलं!

कोरोनाची तीव्रता थांबविण्यासाठी प्रामाणिकपणा असेल तरच “मुंबई मॉडेल” इतर शहरांमध्ये किंवा राज्यात राबवता येईल.  (What is Mumbai Model)

Mumbai Model | काय आहे 'मुंबई मॉडेल', ज्याची सुप्रीम कोर्टानं स्तुती केली, केंद्राला दिल्लीसाठी राबवायला सांगितलं!
mumbai corona
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 10:14 AM

नवी दिल्ली : देशभरात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायलयाने दिल्ली सरकारला ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी मुंबई मॉडेल स्विकारावा, असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर बुधवारी रात्री दिल्ली सरकारसह केंद्रीय अधिकाऱ्यांची मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी इकबाल चहल यांनी या अधिकाऱ्यांना मुंबई मॉडेल नेमकं काय? त्याची अंमलबजावणी कशी करायची याबाबतची माहिती दिली. (What is Mumbai Model BMC severe shortage oxygen)

मुंबई मॉडेल तयार होण्यामागची कारण काय?

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी मला केंद्र सरकारच्या काही सहकाऱ्यांच्या यांचा फोन येत होता. त्यावेळी ते फक्त महाराष्ट्रात कोविड आहे, असं विचारून ते हसत होते. जर कोणी आमच्याकडे बघून हसत असेल तर मी त्यांच्यासह माझे मॉडेल कसे शेयर करू? जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिकण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे मी कामाला लागलो. त्यानंतर मी हे मॉडेल तयार केले. कोरोनाची तीव्रता थांबविण्यासाठी प्रामाणिकपणा असेल तरच “मुंबई मॉडेल” इतर शहरांमध्ये किंवा राज्यात राबवता येईल.

मुंबई मॉडेल नक्की काय? 

मुंबईत आतापर्यंत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.  मुंबईतील उपलब्ध ऑक्सिजनचा जास्तीत जास्त उपयोग, चांगल्याप्रकारे वितरण आणि बफर स्टॉक तयार करणे यासह बीएमसीची विद्यमान संसाधने एकत्रित करण्याच्या क्षमतेमुळेच मुंबईची ऑक्सिजन समस्या आता इतिहास झाला आहे.

मुंबई मॉडेल नेमकं कसे तयार झाले?

गेल्या 16 आणि 17 एप्रिलच्या मध्यरात्री 6 शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा खूप कमी झाला होता. तेव्हा 168 रुग्णांना तातडीने जम्बो कोविड सेंटरच्या कार्डिएक रुग्णवाहिकेत शिफ्ट करण्यात आले. त्यामुळे सगळ्यांचे जीव वाचविण्यात यश आलं. या घटनेनंतर 17 एप्रिलला बीएमसीने राज्य टास्क फोर्सकडे ऑक्सिजन वापरासाठी प्रोटोकॉल बनविण्याची मागणी केली.

ऑक्सिजनचे कोणतेही प्रश्न उद्भवू नयेत, यासाठी केंद्रात पोस्टिंग दरम्यान काम केलेल्या अधिकाऱ्यांशी दिल्लीत संपर्क साधला. यावेळी कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृहसचिव, आरोग्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील आठ शीर्ष राजकारण्यांना ही याबाबत संदेश दिला. ऑक्सिजन आयात करण्यासाठी केंद्राला सूचनाही दिली.

ऑक्सिजनचा पुरवठा कसा होतो?

यादरम्यान हलदियातील युनिटमधून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी लागणारा अवधी आठ दिवसांचा होता. जो खूप जास्त होता. तेव्हा कॅबिनेट सेक्रेटरीला जामनगरमधील रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ऑक्सिजन आयात करण्यास सुचविले. जे मुंबईपासून अवघ्या 16 तासांच्या अंतरावर आहे. त्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत जामनगरहून मुंबईसाठी 25 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला.

त्यानुसार ऑक्सिजन संपृक्ततेची पातळी 94 टक्क्यांच्या पुढे राखली जाण्याची गरज नाही. उच्च-प्रवाहित नेझल ऑक्सिजन डोळे बंद करुन वापरु नये. ऑक्सिजन वापराचे ऑडिट करावे. हे सर्व नियम शहरातील सर्व 176 रुग्णालयांमध्ये लावण्यात आले.

कोणत्याही रुग्णालयात अतिरिक्त बेड्स घालण्याची सक्ती केली जाऊ नये. ऑक्सिजनयुक्त बेड वाढविण्यासाठी रुग्णालयातून एसओएस कॉल येतात. मात्र त्या बेडचा ऑक्सिजन कमतरता पूर्ण भागविण्यास काहीच उपयोग होत नाही, असेही इकबाल चहल म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काम करण्यासाठी फ्री हॅन्ड दिल्याने हे झाले. त्यामुळे त्यांचे आभार, असेही इकबाल सिंग चहल यांनी सांगितले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरु

गेल्या वर्षी मे महिन्यात मुंबई कोविडची परिस्थिती झपाट्याने वाढत असताना आयुक्तपदाचा कार्यभार चहल यांनी स्वीकारला. त्यानंतर वॉर्ड वॉर रूम तयार करणे, बेडसाठी डॅशबोर्ड तयार करणे, कोविड चाचणी अहवाल खाजगी लॅब कडून डायरेक्ट रूग्णांना देण्यास बंदी घालणे, यासंह विविध उपाययोजना करण्यात आल्या.

या पहिल्या लाटेनंतर जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले नाही. त्यामुळे हे सर्व दुसरी लाट हाताळण्यात महत्त्वपूर्ण होते. ही यंत्रणा आता “ऑटो पायलट” वर आहे. मुंबईत आधीच तिसर्‍या लाटाची तयारी सुरू होती. आता अजून जम्बो सुविधा आणि ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यात येत आहे. यात जवळपास 5,500 बेड्स तयार करण्यात येणार आहेत. ते 70 टक्के ऑक्सिजनयुक्त असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (What is Mumbai Model BMC severe shortage oxygen)

संबंधित बातम्या : 

मुंबईत हवाई रुग्णवाहिकेचे ‘Emergency Landing’, टेक ऑफ दरम्यान चाक निखळले, सर्वजण सुखरुप

Mumbai Drive in vaccination centers list | मुंबईत प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण होणार, तुमच्या जवळचे केंद्र बघा

मुंबईकरांनो लक्ष द्या, ‘कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’नुसारच लसीकरण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.