Corona | कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालयं कमी पडू नये, केईएम आणि नायर रुग्णालयं रिकामी करण्याचे आयुक्तांचे आदेश
आरोग्य सेवेची गरज नसणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन रुग्णालये रिक्त कण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने हाहा:कार (BMC Commissioner Order To Hospital) माजवला आहे. देशासह मुंबई आणि महाराष्ट्रातही दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. मुंबई आणि परिसरातील कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची सतत वाढत जाणारी संख्या पाहता रुग्णालये कमी पडणार असल्याने पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयांमधील आरोग्य सेवेची गरज नसणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन रुग्णालये रिक्त कण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालये आणि आरोग्य कर्मचारी सज्ज ठेवण्याचे आदेश पालिका (BMC Commissioner Order To Hospital) आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.
हेही वाचा : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, परदेशात न जाताही पुण्यात महिलेला कोरोनाची लागण
सध्या कस्तुरबा रुग्णालयात 122 , जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात 5 असे एकूण 127 रुग्ण भरती आहेत. कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशनचे 127 बेड असून त्यावर सध्या 122 रुग्ण आहेत. या रुग्णालयात कोरोनाची लागण झालेले आणि संशयित रुग्ण मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे बेडची कमतरता भासण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात आयसोलेशन बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.
मुंबईकरांनी जसं सहजरीत्या सावध राहून अंतर राखणं गरजेचं आहे तसच अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणं देखील अत्यंत आवश्यक आहे.
विविध वस्त्यांमध्ये निवास करणारे ७० लाखांपेक्षा अधिक आणि एका खोलीत राहणारे काही लाख लोकांचे अस्तित्व भोजन, पाणी व काही मूलभूत बाबींवर अवलंबून आहे.#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 20, 2020
पालिकेकडे सध्या असलेल्या बेडची क्षमता येत्या काही दिवसात संपणार आहे. सध्या वाढणाऱ्या रुग्णांची आकडेवारी पाहता येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात आयसोलेशन वॉर्ड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी परेल येथील केईएम आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय रिक्त करण्याचे आदेश दिले आहेत. (BMC Commissioner Order To Hospital) ज्या रुग्णांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नाही, अशा रुग्णांना घरी पाठवून ते बेड कोरोनाच्या बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, पुण्यात आखणी एका महिलेला कोरोना
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Pune Corona Patient) आहे. पुण्यात आणखी एका महिलेला कोरोनाची लागण आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 53 झाली आहे. तर पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. सध्या या महिलेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
- पिंपरी चिंचवड – 12
- पुणे – 10
- मुंबई – 11
- नागपूर – 4
- यवतमाळ – 3
- कल्याण – 3
- नवी मुंबई – 3
- रायगड – 1
- ठाणे -1
- अहमदनगर – 2
- औरंगाबाद – 1
- रत्नागिरी – 1
- उल्हासनगर – 1
- एकूण 53
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
- पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
- पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
- मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
- नागपूर (1) – 12 मार्च
- पुणे (1) – 12 मार्च
- पुणे (3) – 12 मार्च
- ठाणे (1) – 12 मार्च
- मुंबई (1) – 12 मार्च
- नागपूर (2) – 13 मार्च
- पुणे (1) – 13 मार्च
- अहमदनगर (1) – 13 मार्च
- मुंबईत (1) – 13 मार्च
- नागपूर (1) – 14 मार्च
- यवतमाळ (2) – 14 मार्च
- मुंबई (1) – 14 मार्च
- वाशी (1) – 14 मार्च
- पनवेल (1) – 14 मार्च
- कल्याण (1) – 14 मार्च
- पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
- औरंगाबाद (1) – 15 मार्च
- पुणे (1) – 15 मार्च
- मुंबई (3) – 16 मार्च
- नवी मुंबई (1) – 16 मार्च
- यवतमाळ (1) – 16 मार्च
- नवी मुंबई (1) – 16 मार्च
- मुंबई (1) – 17 मार्च
- पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
- पुणे (1) – 18 मार्च
- पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
- मुंबई (1) – 18 मार्च
- रत्नागिरी (1) – 18 मार्च
- मुंबई महिला (1) – 19 मार्च
- उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
- अहमदनगर (1) – 19 मार्च
- मुंबई (2) – 20 मार्च
- पुणे (1) – 20 मार्च
- पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
- पुणे (1) – 21 मार्च
- एकूण – 53 कोरोनाबाधित रुग्ण
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
- कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
- दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
- मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
- पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
- एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
BMC Commissioner Order To Hospital