मुंबई महापालिकेची नऊ रुग्णालये पुन्हा ‘नॉन कोव्हिड’, साथीच्या आजारांवर उपचार होणार

मुंबई उपनगरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी पालिकेने एप्रिलपासून राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा अशी 16 रुग्णालये कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केली होती.

मुंबई महापालिकेची नऊ रुग्णालये पुन्हा 'नॉन कोव्हिड', साथीच्या आजारांवर उपचार होणार
मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Jul 20, 2020 | 9:59 AM

मुंबई : पावसाळ्यात साथीच्या आजारांवरही उपचार व्हावेत, यासाठी मुंबई महापालिकेने नऊ रुग्णालये ‘नॉन कोव्हिड’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘कोरोना’शिवाय इतर आजार झालेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. (BMC declares Nine Hospitals in Mumbai Non COVID again)

कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे बीएमसीने मुंबई उपनगरातील 16 रुग्णालये कोव्हिड रुग्णालये म्हणून घोषित केली होती. आता यातील 9 रुग्णालये पुन्हा ‘नॉन कोव्हिड’ करण्यात आली आहेत. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसारखे आजार बळावतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

या रुग्णालयांमध्ये आजपासून (सोमवार 20 जुलै) कोरोनाग्रस्त रुग्णांना नव्याने दाखल करुन घेतले जाणार नाही. तिथले बाह्यरुग्ण विभाग सुरु राहतील. या रुग्णालयात आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना कोव्हिड सेंटर आणि नायर, केईएम, सायन रुग्णालयात दाखल करण्यात येईल.

हेही वाचा : आधी धारावी आता संपूर्ण मुंबईत कोरोना नियंत्रणात, पालिकेच्या 15 टिप्स!

मुंबई उपनगरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी पालिकेने एप्रिलपासून राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा अशी 16 रुग्णालये कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केली होती.

आता मोठ्या संख्येने बेड्स उपलब्ध झाल्याने उपनगरातील निम्म्या रुग्णालयात नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होणार नाहीत. सध्या या रुग्णालयात जे रुग्ण दाखल आहेत, त्यांच्यावर उपचार होत राहतील. (BMC declares Nine Hospitals in Mumbai Non COVID again)

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

सायन, केईएम आणि नायरमध्ये कोव्हिड तसेच नॉन कोव्हिड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जातील. पण अधिकाधिक रुग्णांना आता कोविड सेंटरमध्येच सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

दुसरीकडे, मुंबईतील 186 पैकी 160 दवाखानेही आता नॉन कोव्हिड करण्यात आले आहेत. तर 28 प्रसुतिगृहांपैकी आता केवळ तीन प्रसुतिगृहे कोव्हिड तर उर्वरित 25 नॉन कोव्हिड असतील.

(BMC declares Nine Hospitals in Mumbai Non COVID again)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.