मुंबई : कोविड प्रतिबंध लसीचा तुटवडा जाणवत असतानाच रविवारी (25 एप्रिल) मुंबईसाठी 1 लाख 58 हजार मात्रा मिळाल्या आहेत. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारपासून (26 ते 28 एप्रिल 2021) असे किमान 3 दिवस मुंबईतील लसीकरण सुरळीत होण्यास मदत होणार आहे (BMC get 1 lac 58 thousand corona vaccines for mumbai on 25 April 2021).
लस साठ्यात कोव्हॅक्सिनची संख्या अतिशय मर्यादीत
दरम्यान, मुंबईला मिळालेल्या लस साठ्यात कोव्हॅक्सिन लसीचा साठा अतिशय मर्यादीत असल्याने मोजक्याच केंद्रांवर आणि त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेला दीड लाख लसींचा साठा प्राप्त, पुढील तीन दिवस बहुतांशी केंद्रांवर होणार कोविड प्रतिबंध लसीकरण pic.twitter.com/rcC4xwroQl
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 25, 2021
आधी दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे 59 लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 132 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेवून दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.
कोविशिल्ड लसीच्या 1 लाख 50 हजार, तर कोव्हॅक्सिनच्या 8 हजार मात्रा
बृहन्मुंबई महानगर पालिकेला आज कोविशिल्ड लसीच्या 1 लाख 50 हजार तर कोव्हॅक्सिन लसीच्या 8 हजार अशा एकूण 1 लाख 58 हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. हा साठा महानगरपालिकेच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवण केंद्रात नेण्यात आला आहे. मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे.
काही केंद्रांवर लसीकरण उशिराने सुरू होण्याची शक्यता
लस साठा उपलब्ध झाल्याने पुढील किमान तीन दिवस खासगी केंद्रांना देखील लसीकरण मोहीम राबवता येईल. लस साठा प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्याचे वितरण सुरू होते. ज्यांनी लस साठा आज नेला नाही त्यांना उद्या सकाळी 8 वाजेपासून लस साठा नेता येईल. त्यामुळे 26 एप्रिलला काही केंद्रांवर लसीकरण प्रत्यक्ष उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन बीएमसीने केलंय.
हेही वाचा :
VIDEO: मुंबईकर काही ऐकेनात, सलग 15 व्या दिवशी लोकलला प्रचंड गर्दी; कोरोना नियमांचे तीन तेरा
मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा, बीएमसीच्या 6 रुग्णालयांमधील 168 कोरोना रुग्ण सुरक्षित ठिकाणी हलवले
Mumbai Corona | मुंबईत 10 हजार 797 मजले सील, सर्वाधिक मायक्रो कंटेनमेंट झोन कोणत्या वॉर्डमध्ये?
व्हिडीओ पाहा :
BMC get 1 lac 58 thousand corona vaccines for mumbai on 25 April 2021