Corona Second Wave : मुंबईत 70 हजार बेड, 400 सेंटर्स सज्ज, दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनाची तयारी

जगभरात अनेक ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट येऊ लागली आहे. दिवाळीनंतर मुंबईतही कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातोय.

Corona Second Wave : मुंबईत 70 हजार बेड, 400 सेंटर्स सज्ज, दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनाची तयारी
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 4:49 PM

मुंबई : दिवाळीनंतर मुंबईत कोरोनाची दुसरी लाट (second wave of Coronavirus) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई महापालिका (BMC) प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढण्यासाठी महापालिकेची काय तयारी आहे? पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? याबाबत आढावा घेतला. (BMC is ready to fight with second wave of Corona says Additional Commissioner Suresh Kakani)

यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, रुग्णालय आणि कोरोना सेंटरमधील बेड तयार आहेत. ऑक्सिजन व्हेंटिलेटर तयार ठेवण्यात आले आहेत. महापालिकेकडे औषधांचा आणि इंजेक्शनचा पुरेसा साठा आहे. तसेच महापालिकेकडे सध्या 70 हजार बेड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी 20 हजार बेड हे डीसीएचसीसाठी राखीव आहेत. हे बेड क्रिटिकल (गंभीर रुग्ण) आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आहेत.

काकाणी यांनी सांगितले की, सीसीसी 1 मध्ये high risk रुग्णांना तर सीसीसी 2 मध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवले जाते. यासाठी 50 हजार बेड उपलब्ध असून ते तीन टप्प्यात सुरू करण्याची तयारी आहे. सध्या मुंबईत 58 अॅक्टिव्ह कोव्हिड सेंटर्स आहेत. त्यापैकी केवळ 10 टक्के बेड भरले आहेत. 35 सेंटर असे आहेत जे 2 दिवसांच्या नोटिसवर सुरु करता येतील, तर 400 सेंटर असे आहेत जे 8 दिवसांच्या नोटिसवर सुरू करता येतील. आवश्यकता पडल्यास ते टप्प्याटप्याने सुरु करता येतील.

काकाणी म्हणाले की, सर्व कोव्हिड सेंटर्स, रुग्णालयांमध्ये पूर्वी सिलेंडरद्वारे ऑक्सिजनपुरवठा केला जात होता. मात्र आता टर्बो फॅसिलिटीद्वारे ऑक्सिजन पुरवठा (Oxygen supply through turbo facility) केला जात आहे. यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. सर्व जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये ओपीडी सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये कोरोनाच्या चाचण्या करून पॉझिटिव्ह रुग्णांना अॅडमिट करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. पालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

…तर कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते: मुख्यमंत्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असा इशारा देतानाच मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाची दुसरी लाट

पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जनसंपर्क अधिक असलेले व्यावसायिक, घरगुती कामगार, शासकीय कर्मचारी हे सुपर स्प्रेडरमध्ये येतात. या सुपर स्प्रेडरमुळेच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर महापालिका आणि जिल्हा परिषदांना सतर्क राहण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता! मुंबई महापालिका प्रशासनाच्या तयारीचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता, यंत्रणा सज्ज, पुणेकरांनो काळजी घ्या, महापौर मोहोळ यांचं आवाहन

फिरायला जाताय? गुगल मॅप्सवर जाणून घ्या प्रत्येक ठिकाणावरील कोरोना केसेसची माहिती

(BMC is ready to fight with second wave of Corona says Additional Commissioner Suresh Kakani)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.