BMC Election 2022 : मुंबई मनपा निवडणुकांपूर्वी प्रभाग पुनर्रचना, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवि राजा यांना पत्र पाठवलं आहे. प्रारुप प्रभाग रचना जाहीर करणार असून त्यानंतर हरकती आणि सूचना मागवणार असल्याचे पत्रात स्पष्ट केलं आहे.

BMC Election 2022 : मुंबई मनपा निवडणुकांपूर्वी प्रभाग पुनर्रचना, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 8:07 AM

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election 2022 ) फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. तत्पूर्वी वॉर्ड डिलिमेटेशन म्हणजे प्रभाग रचना होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. डिलिमिटेशन करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस आग्रही आहे. तर भाजपचा मात्र याला विरोध आहे. प्रभागांचे सीमांकन बदलल्यास कोर्टात जाण्याचा इशारा भाजपने दोन दिवसांपूर्वीच दिलेला आहे. (BMC Mumbai Mahapalika Shivsena Congress demands Ward Delimitation BJP Opposes)

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवि राजा यांना पत्र पाठवलं आहे. प्रारुप प्रभाग रचना जाहीर करणार असून त्यानंतर हरकती आणि सूचना मागवणार असल्याचे पत्रात स्पष्ट केलं आहे. रवि राजा यांनी 2017 मध्ये निवडणूक आयोगाला पत्र लिहून भाजपने भौगोलिक सलगता न ठेवता आपल्या सोयीच्या दृष्टीने सुमारे 45 प्रभागांची रचना केल्याची तक्रार केली होती. त्यामुळे संबंधित प्रभागांची रचना बदलण्याची मागणी त्यांनी केली होती.

पालिका अधिनियमानुसार दर पाच वर्षांनी निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना करण्याचा नियम आहे. त्यामुळे नियमानुसार ही प्रभाग रचना होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबई मनपा निवडणूक ठरल्या वेळेतच?

कोरोनामुळे अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे. त्यामुळे त्यावेळीच निवडणूक होणं अपेक्षित आहेत. मात्र सध्याची कोरोनाची स्थिती आणि संभाव्य तिसरी लाट पाहता, त्याबाबत त्या त्या वेळी निर्णय घेतला जाईल, असं राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला कळवल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला सांगितलं होतं.

मुंबई मनपाचं निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिले होते. मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे. साहजिकच या महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या खिशात ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरु असते. बीएमसी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच अद्याप जवळपास 9 महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 2 अभासे – 1

एकूण – 227

बहुमताचा आकडा – 114

संबंधित बातम्या :

BMC Election 2022 : तयारीला लागा, मुंबई मनपाची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं, वॉर्ड पुनर्रचनेचे आदेश

मुदतपूर्व निवडणूक ते 30 वॉर्ड फोडण्याचे प्रयत्न, शिवसेनेचं कारस्थान, आशिष शेलारांचे 4 मोठे आरोप

(BMC Mumbai Mahapalika Shivsena Congress demands Ward Delimitation BJP Opposes)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.