Mumbai Corona | चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली, बीएमसीचा दावा

मुंबईत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

Mumbai Corona | चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली, बीएमसीचा दावा
Follow us
| Updated on: Sep 07, 2020 | 4:33 PM

मुंबई : मुंबईत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे (BMC On Corona Cases In Mumbai). मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या आठवड्याभरात शहर-उपनगरात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख चढता असल्याचे दिसून येते आहे. शिवाय, मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येतही 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आलं. मात्र, कोरोना चाचण्या वाढवल्याने रुग्णसंख्या वाढल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे (BMC On Corona Cases In Mumbai).

मे आणि जून महिन्यात रोज सरासरी 4 हजार, जुलै महिन्यात रोज सरासरी 6500, ऑगस्ट महिन्यात रोज 7619 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर सप्टेंबर महिन्यात रोज 9 ते 10 हजार कोरोना चाचण्या मुंबईत केल्या जात आहेत.

तर रविवारी (6 सप्टेंबर) 11,861 चाचण्या करण्यात आल्या असून चाचण्यांची संख्या रोज 10 हजार ते 14 हजारांवर नेली जाणार आहे. यामुळे 1000 ते 1300 दरम्यान वाढत असलेली रुग्णसंख्या आता 1700 ते 2000 दरम्यान वाढत आहे. यामध्ये रॅपिड टेस्टची संख्या धरण्यात आलेली नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली (BMC On Corona Cases In Mumbai).

मुंबईत पुरेसे बेड्स उपलब्ध, मुंबईकरांनी घाबरु नये – महापालिका

मुंबईत येत्या तीन दिवसांत 250 आयसीयू बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. त्यामुळे रोज 350 आयसीयू बेड्स रिकामे राहतील, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. सध्या 4800 बेड्स मुंबईत रिकामे असून येत्या काही दिवसांत जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये आणखी 6200 बेड्स वाढवले जाणार आहेत.

वाढत असलेल्या रुग्णसंख्येला सामावून घेण्यासाठी मुंबईत पुरेसे बेड उपलब्ध असल्यानं मुंबईकरांनी घाबरु नये, असं आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

BMC On Corona Cases In Mumbai

संबंधित बातम्या :

लोकल-कार्यालये एक नोव्हेंबरपासून उघडा, TIFR चा बीएमसीला अहवाल, शाळांसाठी ‘ही’ तारीख

मुंबईकरांसमोर नवे संकट, कोरोना रुग्णांच्या संपर्कातील अतिधोक्याच्या व्यक्तींमध्ये वाढ

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.