Marathi Board : निवडणुकीच्या तोंडवर मुंबईतील दुकानांना मराठी पाट्या लावण्यास मुदतवाढ, राजकीय चर्चांना उधाण

इतर भाषिक मतदारांना नारज न करण्यासाठी तर हा निर्णय घेतला नाही ना? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. मुंबई महानगरातील दुकाने व आस्थापना यांच्या मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी दिनांक 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Marathi Board : निवडणुकीच्या तोंडवर मुंबईतील दुकानांना मराठी पाट्या लावण्यास मुदतवाढ, राजकीय चर्चांना उधाण
मुंबई महापालिका Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 9:55 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत मराठी पाट्यांचा (Marathi Board) मुद्दा गाजत आहे. आता पुन्हा ऐना निवडणुकीच्या (BMC Election 2022) तोंडावर मुंबई महानगरपालिकेडून (Mumbai Municipal Corporation) मराठी पाठ्या लावण्यास मुदतवाढ देण्यात आलीय. त्यामुळे इतर भाषिक मतदारांना नारज न करण्यासाठी तर हा निर्णय घेतला नाही ना? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. मुंबई महानगरातील दुकाने व आस्थापना यांच्या मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी दिनांक 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विविध व्यापारी संघटनांनी महानगरपालिका प्रशासनाला केलेल्या विनंतीचा विचार करुन ही मुदतवाढ देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिक्षेत्रात मराठी नामफलकासाठी मद्य विक्रीची दुकाने व मद्य पुरविण्यात येणाऱ्या आस्थापनांव्यतिरिक्त इतर दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी दिनांक 31 मे 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता दिनांक 30 जून 2022 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.

फलक मराठी भाषेतीलच हवा

महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 24, दिनांक 17 मार्च 2022’ अन्वये ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, 2022’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.  या अधिनियमाचे कलम 36 क (1) च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम 7 लागू आहे, त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असला पाहिजे.

मराठी फॉन्ट मोठा असवा

अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मात्र, मराठी भाषेतील अक्षरलेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font Size), इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असता कामा नये, म्हणजेच मराठी टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मोठ्या आकारात असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

व्यापाऱ्यांना पालिकेचं आवाहन

अधिनियमातील या तरतुदींच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबई महानगरातील सर्व व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, अधिनियमाच्या सदर तरतुदीनुसार, आपल्या दुकाने / आस्थापनांवरील नामफलक प्रथमदर्शनी मराठी देवनागरी लिपीत व इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा मोठ्या आकारात दिसेल, अशारितीने प्रदर्शित करावा.

वेळेत फलक न लागल्यास कारवाई

वाढीव मुदतीत देखील कार्यवाही न करता, अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्यास दुकाने व आस्थापनांच्या मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.