बीएमसीकडून ‘बेस्ट’ला 482. 28 कोटी रुपयांची मदत; कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीचा प्रश्न मार्गी लागणार!
आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेकडून अनेकदा मदत करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने बेस्टला 482. 28 कोटी रुपयांची मदत केली आहे. यातून कर्मचाऱ्यांच्या थकीत ग्रॅच्युइटीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
मुंबई : बेस्टला (Best) मुंबईकरांची (Mumbaikar) दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखले जाते. मात्र अनेकदा बेस्ट आर्थिक अडचणीत (Best in financial crisis) आल्याचे देखील पहायला मिळाले आहे. तोटा वाढल्याने बेस्टला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. बेस्ट अडचणीत सापडल्यानंतर अनेकदा मुंबई महापालिकेच्या वतीने बेस्टला मदतीचा हात पुढे केला जातो. आता पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेच्या वतीने आर्थिक अधार देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने बेस्टला तब्बल 482. 28 कोटी रुपयांची मदत केली आहे. यातील 203. 28 कोटी रुपये हे पालिकेच्या बँक बॅलन्समधून तर उर्वरीत 279 कोटी रुपये हे फिक्स डिपॉझिटमधून देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. कर्मचाऱ्यांची थकीत ग्रॅच्युइटी देण्यासाठी आता बेस्टकडून या निधीचा उपयोग होणार आहे.
कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी थकली
लोकल ही मुंबईकरांची पहिली लाईफलाईन आहे. मात्र लोकलनंतर मुंबईकरांना फक्त बेस्टचाच आधार असतो. दर दिवशी लाखो लोक बेस्टने प्रवास करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून बेस्ट तोट्यात आहे. कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी देखील थकली होती. संकटात सापडलेल्या बेस्टला नेहमीच महापालिकेकडून मदतीचा हात देण्यात येतो. यावेळी देखील महापालिकेने बेस्टला सुमारे 482. 28 कोटी रुपयांची मदत केली आहे. यातील 203. 28 कोटी रुपये हे पालिकेच्या बँक बॅलन्समधून तर उर्वरीत 279 कोटी रुपये हे फिक्स डिपॉझिटमधून देण्यात आले आहेत. आता या रकमेतून कर्मचाऱ्यांच्या थकीत ग्रॅच्युइटीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
यापूर्वीही दिले अनुदान
बेस्टमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करतात. कोरोना काळात लोकलची सेवा ठप्प असताना बेस्टने मुंबईकरांना सेवा पुरवली. बेस्ट आपल्या 3500 बसेससह एसटीच्या एक हजार गाड्या घेऊन मुंबईकरांच्या सेवेला धावून आली. यासाठी महापलिकेने या आधीही बेस्टला 33. 80 कोटींचे अनुदान दिले होते. तर आता देखील 482. 28 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीमुळे बेस्टला मोठा आधार मिळाला आहे.