मुंबईत कचऱ्यापासून वीजनिर्मितीला ग्रीन सिग्नल, स्थायी समितीकडून शिक्कामोर्तब
मुंबई महापालिकेच्या बैठकीत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केलं आहे. (Standing Committee Approve Mumbai Electricity Generate from Garbage Project)
मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या बैठकीत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. (Standing Committee Approve Mumbai Electricity Generate from Garbage Project)
मुंबईत दररोज सुमारे 5 हजार मॅट्रिक टन कचरा गोळा होतो. या कचऱ्याची याच ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. कचऱ्याची विल्हेवाट लावताना प्रदूषण होते. मुंबईतील कचरा आणि प्रदूषण कमी व्हावं यासाठी पालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प एक हजार कोटी रुपयांचा असून याद्वारे 25 मेगाव्हॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे.
मुंबईत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रस्ताव हा 2018 मध्ये मांडण्यात आला होता. मात्र, त्या प्रस्तावात भ्रष्टाचार असल्याचे कारण देत शिवसेनेने देवनार डम्पिंग ग्राऊंडवर वीजनिर्मितीच्या प्रस्तावाला विरोध केला होता. आज दोन वर्षांनी हा प्रस्ताव स्थायी समितीत पुन्हा एकदा मंजुरीसाठी आला. त्यावेळी मात्र शिवसेनेने कोणत्याही प्रकारचा विरोध न करता यासाठी मंजुरी दिली.
या प्रस्तावाविरोधात विरोधकांना मत मांडण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे या प्रस्तावाची मंजुरी ही नियमबाह्य आहे, असे पत्र समाजवादी पार्टीचे गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी स्थायी समितीला दिलं आहे. (Standing Committee Approve Mumbai Electricity Generate from Garbage Project)
संबंधित बातम्या :
चितळे बंधूंचे ठाण्यात ‘ठाण’, मुक्ता बर्वेच्या हस्ते दुकानाचे उद्घाटन
BMC पाठोपाठ BEST कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड, गेल्या वर्षीपेक्षा 4600 रुपये अधिक बोनस