Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीएसएमटी स्टेशनबाहेरील ‘तो’ पूल पुन्हा बांधणार, सहा महिन्यात पूल खुला करण्याचा प्रयत्न

त्यानंतर आता पुन्हा पालिकेकडून पूल बांधण्याची प्रकिया सुरु करण्यात आली आहे. (BMC Started Reconstruct CSMT Himalaya bridge)

सीएसएमटी स्टेशनबाहेरील 'तो' पूल पुन्हा बांधणार, सहा महिन्यात पूल खुला करण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 3:13 PM

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स स्थानकाजवळील हिमालय पूल दुर्घटनेला एक वर्ष उलटून गेलं आहे. त्यानंतर आता पुन्हा पालिकेकडून पूल बांधण्याची प्रकिया सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता पुर्नबांधणी करण्यात येणारा हिमालय पूल हा लोखंडी न बांधता स्टेनलेस स्टीलने बांधण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाचे घेतला आहे. स्टेनलेस स्टीलच्या पुलामुळे भविष्यात पुलाला गंज पकडण्याचा धोका टळेल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. (BMC Started Reconstruct CSMT Himalaya bridge)

सीएसएमटी स्टेशनबाहेरील हिमालय पुलाचा भाग हा 14 मार्च 2019 मध्ये कोसळला होता. त्यात सात जणांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर हा पूल बांधण्याबाबत पालिकेकडून आराखडा तयार करण्यात येत होता. त्यानुसार अखेर हिमालय पूल स्टेनलेस स्टीलने बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

या पुलाबाबतची निविदा पुढील आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहेत. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच काम सुरु करण्यात येणार आहे. पुढील सहा महिन्यात पूल पादचाऱ्यांना वापरासाठी खुला करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती पूल विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्रकुमार तळकर यांनी दिली.

दरम्यान, मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव मुंबईत झाल्यानंतर पालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाविरोधात लढा देत आहे. पूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाला हरवण्यासाठी लढा देत आहेत. मात्र कोरोनाच्या संकट समयी मुंबईकरांच्या जीवाची काळजी घेत धोकादायक पुलांचे काम सुरु ठेवले आहे. अनेक पुलांचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. हे का पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हँकॉक ब्रीज मे अखेरपर्यंत खुला होणार!

धोकादायक ठरल्याने 2016 मध्ये 125 वर्ष जुना हॅकाॅक पूल पाडण्यात आला. त्यानंतर परवानग्यांच्या अडचणीत पुलांचे काम धीम्या गतीने सुरु होते.

पण माझगाव, भायखळा परिसरातील लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी पुलाचे काम हाती घेत 650 मेट्रीक टनाच्या गॅडरचा एक भाग टाकण्यात आला आहे. दुसरा गडॅर जानेवारीपर्यंत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे हँकॉक पुलाचे काम मेपर्यंत पूर्ण होणार आहे. मे अखेरपर्यत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (BMC Started Reconstruct CSMT Himalaya bridge)

संबंधित बातम्या : 

मुंबईत आजारांमध्ये लक्षणीय घट, हेपटायटिस आणि ग्रॅस्ट्रो रुग्णांची संख्या घटली

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.