Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उच्चभ्रू नागरिकांकडून नियमांची ऐशीतैशी; दक्षिण मुंबईतील बारवर पालिकेची कारवाई, 245 जणांवर गुन्हे

बीएमसीने 17 मार्चच्या मध्यरात्री मुंबईतील ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बारवर धाड टाकली (BMC Took Action On Arborzine Restaurant And Bar)

उच्चभ्रू नागरिकांकडून नियमांची ऐशीतैशी; दक्षिण मुंबईतील बारवर पालिकेची कारवाई, 245 जणांवर गुन्हे
Arborzine Restaurant And Bar
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 3:17 PM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे सतत वाढत आहेत (Arborzine Restaurant And Bar). गेल्या 24 तासांत राज्यात 23,179 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 84 जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही नागरिक खबरदारी घ्यायला तयार नाहीत. मुंबई कडक निर्बंध लादूनही नागरिक वारंवार कोरोना नियंमांच उल्लंघन करताना दिसून येत आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. याचदरम्यान बीएमसीने 17 मार्चच्या मध्यरात्री मुंबईतील ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बारवर धाड टाकली (BMC Took Action On Arborzine Restaurant And Bar For Violating Corona Rules).

245 जण विना मास्क

महानगरपालिकेच्या “डी” विभाग कार्यालयातर्फे रात्री 1 वाजताच्या सुमारास ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलवर महापालिकेच्या पथकाने धाड टाकली. यावेळी तब्बल 245 जण विना मास्क आढळून आले. बीएमसीने या 245 जणांवर विना मास्क कारवाईसह सामाजिक अंतर न राखणे आणि शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, हे रेस्टॉरन्ट आणि बार महापालिकेने बंद केले आहे. तसेच, रात्री 245 लोकांवरती विना मास्क आढळल्यामुळे 19 हजार 400 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

Arborzine Restaurant And Bar

Arborzine Restaurant And Bar

राज्यात कोरोनाची स्थिती

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनाही राबवण्यात येत आहेत. परंतु तरीही कोरोनाचा फैलाव थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 23,179 नवीन रुग्ण सापडले आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 23,70,507 झालीय.

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 53,080 लोकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस देण्यासाठी तातडीने परवानगी देण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले की, लसीकरणाला वेग आला आहे. यासाठी कोरोना लसीचे 2.20 कोटी डोस केंद्र सरकारकडे मागविले गेले आहेत. टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहिले असून दर आठवड्याला 20 लाख डोस राज्यांना उपलब्ध करुन देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

BMC Took Action On Arborzine Restaurant And Bar For Violating Corona Rules

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update : 24 तासांमध्ये कोरोनाचा उद्रेक, ताज्या आकड्यांनी चिंता वाढवली

'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.