Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना, पाईपलाईन दुरुस्तीवेळी विजेच्या झटक्याने दोघांचा मृत्यू

महापालिकेची पाईपलाईन दुरुस्ती करताना विजेचा शॉक लागून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. (BMC Water department 2 labour died during pipeline repairing work) 

चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना, पाईपलाईन दुरुस्तीवेळी विजेच्या झटक्याने दोघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 1:48 PM

मुंबई : मुंबईतील चेंबूर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबई महापालिकेची पाईपलाईन दुरुस्ती करताना विजेचा शॉक लागून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गणेश उगले (45), अमोल काळे (40) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचं नाव आहे. (BMC Water department 2 labour died during pipeline repairing work)

मिळाेलल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सुमन नगर येथे पालिकेच्या जलवाहिनीचं दुरुस्ती काम सुरु आहे. सकाळी 8 च्या सुमारास पाणीखात्याचे कर्मचारी खड्ड्यात उतरुन ती जलवाहिनी दुरुस्ती करत होते. ही पाईपलाईन दुरुस्त करत असताना पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना विजेचा शॉक लागला. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

हा शॉक इतका जबरदस्त होता की, खड्ड्यात काम करणारे सात कर्मचारी खड्ड्यातून बाहेर उडाले. यामुळे ते कर्मचारी जखमी झाले. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.

1) गणेश उगले (45) – मृत्यू 2)अमोल काळे (40)– मृत्यू 3) नाना पुकाले (41) – जखमी 4) महेश जाधव (40)- जखमी 5) नरेश अधंगले (40) – जखमी 6) राकेश जाधव (39) – जखमी 7) अनिल चव्हाण (43)- जखमी  (BMC Water department 2 labour died during pipeline repairing work)

संबंधित बातम्या : 

रायफलमधून चुकून झाली फायरिंग, मुंबईत शिपायाचा जागीच मृत्यू

मुंबई-गोवा हायवेवर धावती कार पेटली, चालक बचावला

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.