VIDEO: आधी अहवाल, नंतर नोटीस मगच कारवाई; राणेंच्या बंगल्यात पालिका अधिकाऱ्यांची दोन तास पाहणी

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन तास पाहणी केली. या बंगल्यातील अतिरिक्त बांधकामासाठी ही पाहणी करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

VIDEO: आधी अहवाल, नंतर नोटीस मगच कारवाई; राणेंच्या बंगल्यात पालिका अधिकाऱ्यांची दोन तास पाहणी
आधी अहवाल, नंतर नोटीस मगच कारवाई; राणेंच्या बंगल्यात पालिका अधिकाऱ्यांची दोन तास पाहणी
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 3:59 PM

मुंबई: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या जुहू येथील अधिश (adhish) बंगल्याची मुंबई महापालिकेच्या (bmc) अधिकाऱ्यांनी दोन तास पाहणी केली. या बंगल्यातील अतिरिक्त बांधकामासाठी ही पाहणी करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. बंगल्यात सीआरझेड आणि एफएसआयचं उल्लंघन झाल्याची तक्रार असल्याने महापालिकेने त्याबाबतचीही पाहणी केली. यावेळी महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत पोलीसही होते. महापालिकेचे अधिकारी बंगल्यात पाहणी करत असताना नारायण राणे हे बंगल्यातच होते. दोन तास ही पाहणी झाल्यानंतर पालिकेच्या 9 जणांची टीम निघून गेली. या पाहणीचा महापालिका एक अहवाल तयार करणार आहे. पाहणीत बंगल्यात बेकायदेशीर गोष्टी आढळलेल्या दिसल्यास त्यावर राणेंना नोटीस बजावली जाईल. आणि मगच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, आज राणेंच्या बंगल्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यामध्ये सीआरझेड आणि एफएसआयचं उल्लंघन झाल्याची तक्रार आली होती. त्यानंतर पालिकेच्या के ईस्ट वॉर्ड आणि इमारत मूल्यांकन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या 9 जणांच्या टीमने राणेंच्या बंगल्याची संयुक्त तपासणी केली. वॉर्ड ऑफिसर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात ही पाहणी करण्यात आली. पाहणी करण्यापूर्वी पालिकेचे अधिकारी पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांचं संरक्षण घेतल्यानंतरच या अधिकाऱ्यांनी राणेंच्या बंगल्यात प्रवेश केला. यावेळी खुद्द नारायण राणेही घरी उपस्थित होते.

बंगल्याचे फोटो घेतले

पालिकेकडून मंजूर आराखडे, मूळ कागदपत्रे आणि सद्यस्थितीत असलेले बंगल्याचे अंतर्गत बांधकाम यांची तपासणी करण्यात आली. पालिकेला आलेल्या तक्रारीत या गोष्टींकडे लक्ष वेधण्यात आले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी बंगल्यातील अंतर्गत फोटोही काढले. अधिकाऱ्यांनी सुमारे दोन तास पाहणी केली. यावेळी राणेंनी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केल्याचं सूत्रांनी सांगितलं. सद्यस्थितीतील बांधकाम आणि मंजूर आराखडा यांच्यात तुलनात्मक काय फरक आहे यावर पालिका अहवाल तयार करणार आहे. के पश्चिम वॉर्डाचे अधिकारीच हा अहवाल तयार करणार आहेत. तसेच पाहणीचा अहवाल तयार करून राणेंना निष्कर्षांवर आधारित नोटीस पाठवली जाईल, असं सूत्रांनी सांगितलं.

महापौर काय म्हणाल्या होत्या?

दरम्यान, महापालिकेचे अधिकारी राणे यांच्या बंगल्यात पाहणीसाठी गेले होते. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. राणे यांच्या बंगल्यात सीआरझेडचं उल्लंघन झाल्याचं केंद्राने सांगितलं होतं. महापालिकेची टीम पहिल्यांदाच राणेंच्या बंगल्यावर गेली नाही. बंगल्यातील काही पोर्शनमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे ते पाहणी करायला गेले आहेत. राणे त्यांना सहकार्य करतील ही अपेक्षा आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या.

संबंधित बातम्या:

चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काहीच फरक पडणार नाही, आघाडीचा प्रयोग आधीही फसला: फडणवीस

आमदार कांदेंचा भुजबळांना पुन्हा धक्का; झेडपी निवडणुकीच्या तोंडावर नांदगावमध्ये राष्ट्रवादीला सुरूंग

Maharashtra News Live Update : सरकार सूडाचं राजकारण करतंय, फडणवीसांचा औरंगाबादेत आरोप

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.