Bollywood : ‘मोहरा’ पासून ‘अग्निसाक्षी’ पर्यंत… 90 मधील ‘हे’ चित्रपट आहेत ऑल टाइम फेवरेट

आपण ज्यावेळी फ्री असतो किंवा सुट्टीच्या दिवशी आपला वेळ जात नाही अशावेळी आपण एखाद्या चांगल्या चित्रपटाच्या शोधात असतो. तर बहुतेक लोक हे 90 च्या दशकातील चित्रपट आवर्जून पाहतातच.

Bollywood : 'मोहरा' पासून 'अग्निसाक्षी' पर्यंत... 90 मधील 'हे' चित्रपट आहेत ऑल टाइम फेवरेट
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 11:06 PM

मुंबई :  अनेक नवनवीन चित्रपट, ओटीटीवरती वेब सीरिज पाहत असतो. पण अशातही आपण 90 च्या दशकातील ब्लॉकबस्टर असलेले चित्रपट पाहणं काही सोडत नाही. मग आपण ज्यावेळी फ्री असतो किंवा सुट्टीच्या दिवशी आपला वेळ जात नाही अशावेळी आपण एखाद्या चांगल्या चित्रपटाच्या शोधात असतो. तर बहुतेक लोक हे 90 च्या दशकातील चित्रपट आवर्जून पाहतातच. तर आता आपण काही अशा पाच चित्रपटांबाबत जाणून घेणार आहोत जे 90 च्या दशकात सुपरहिट ठरले होते.

खलनायक – हा चित्रपट 6 ऑगस्ट 1993 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटातील गाणी देखील सुपरहिट ठरली होती. तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही Amazon Prime Video वर हा चित्रपट पाहू शकता.

डर – या चित्रपटानं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट 24 डिसेंबर 1993 रोजी प्रदर्शित झाला होता. शाहरुख खान, सनी देओल, जुही चावला, अनुपम खेर हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. तसंच या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. आजही हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. तर आताही तुम्ही Amazon Prime Video वर हा चित्रपट पाहू शकता.

मोहरा– हा चित्रपट 1 जुलै 1994 रोजी प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल, नसरुद्दीन शहा हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. तसेच हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील गाणी देखील हिट झाली होती. या चित्रपटातील टिपटिप बरसा पानी हे गाणं आजही प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. तर तुम्हाला एखादा चित्रपट पहायचा असेल तर तुम्ही Zee 5 वर हा चित्रपट आवर्जून पहा.

अग्निसाक्षी – अग्निसाक्षी हा चित्रपट देखील लोकांचा अजूनही आवडीचा चित्रपट आहे. 15 मार्च 1996 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची स्टोरी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. त्यामुळे हा देखील चित्रपट चांगला सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात नाना पाटेकर, मनीषा कोइराला, जय किशराव, दिव्या दत्ता असे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर तुम्हालाही हा चित्रपट पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही Zee 5 वर हा चित्रपट पाहू शकता.

क्रांतीवीर – नाना पाटेकर आणि डिंपल कपाडिया यांचा क्रांतिवीर हा चित्रपट चांगला सुपरहिट ठरला होता. 22 जुलै 1994 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. भरपूर लोकांचा हा  आवडीचा चित्रपट आहे. तर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही Zee5 वर हा चित्रपट पाहू शकता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.