Bombay High Court : ‘त्या’ फरार व्यवसायिकांना हजर करा; न्यायालयाचे पोलीस आयुक्तांना आदेश

आर्थिक व्यवहाराप्रकरणात शरण येण्याचे आदेश देऊन देखील, शरण न आल्याने दोघा व्यवसायिकांना शोधून न्यायालयात (Court) हजर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) वतीने मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांना देण्यात आले आहेत.

Bombay High Court : 'त्या' फरार व्यवसायिकांना हजर करा; न्यायालयाचे पोलीस आयुक्तांना आदेश
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 7:02 AM

मुंबई : आर्थिक व्यवहाराप्रकरणात शरण येण्याचे आदेश देऊन देखील, शरण न आल्याने दोघा व्यवसायिकांना शोधून न्यायालयात (Court) हजर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) वतीने मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांना देण्यात आले आहेत. राजेन ध्रुव आणि हिरेन ध्रुव अशी या फरार व्यवसायिकांची नावे आहेत. फरार व्यवसायिकांना न्यायालयात हजर करा तसेच त्यांची खाती गोठवा असे देखील न्यायलयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. राजेन ध्रुव आणि हिरेन ध्रुव या व्यवसायिकांचा पैशांच्या देवाण-घेवाणीवरून अ‍ॅक्सिस फायनान्स लिमिटेडशी वाद झाला होता. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले.न्यायालयाने या प्रकरणात दोघांना दोषी मानत त्यांना सहा महिन्यांच्या साध्या कारवासाची शिक्षा सुनावली. मात्र त्यानंतर या दोघा व्यवसायिंकानी हप्त्यांमध्ये पैसै फेडण्याची न्यायालयाला हमी दिल्याने न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. मात्र हमी न पाळल्याने न्यायलयाचे आदेश असूनही हे व्यवसायिक कोर्टता गैरहज राहिले, त्यामुळे न्यायालयाने आता संबंधित व्यवसायिकांना शोधून कोर्टात हजर करा असे आदेश पोलिसांना दिले आहे.

नेमकं प्रकरण काय?

ऑर्बिट व्हेंचर डेव्हलपर्सचे राजेन व हिरेन या व्यवसायिकांचा अ‍ॅक्सिस फायनान्स लिमिटेडशी वाद झाला होता. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. या प्रकरणात न्यायालयाने राजेन व हिरेन यांना दोषी ठरवत सहा महिने साध्या कारवासाची शिक्षा सुनावली. मात्र त्यानंतर या दोघा व्यवसायिंकानी 102 कोटी रुपये सहा हप्त्यांमध्ये फेडतो तसेच खार पश्चिमेला असलेली सदनिका अन्य कोणालाही विकणार नाही अशी हमी न्यायालयाला दिली होती. त्यामुळे न्यायालयाने या व्यवसायिकांच्या शिक्षेला स्थगिती दिली. मात्र संबंधित व्यवसायिकांनी हमी न पाळल्याने शुक्रवारी न्यायालयासमोर शरण या असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले होते.

हे सुद्धा वाचा

लुकआऊट नोटीस जारी

मात्र शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान हे दोनही व्यवसायिक गैरहजर राहिले तसेच फरार झाले, याची गंभीर दखल न्यायलयाकडून घेण्यात आली आहे. न्यायमूर्ती के. आर. श्रीराम आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी या प्रकरणात संबंधित व्यवसायिकांना आमच्या समोर हजर करा असे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहे. तसेच राजेन ध्रुव आणि हिरेन ध्रुव याच्याविरोधात विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने लुकआऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.