‘टेस्ट ट्यूब बेबी’ बनला पिता, एकाच रुग्णालयात जन्म झाला बापलेकाचा

टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने बाळाचा जन्म होणे तंत्रज्ञान आता नवीन राहीलेले नाही. परंतू जेव्हा हे तंत्रज्ञान नवे होते त्यावेळी टेस्ट ट्यूब बेबी तंत्राने जन्म झालेल्या मुंबईच्या चेंबूर येथील लव्ह सिंह हे आता स्वत: पिता झाले आहेत. त्यांच्या पत्नी जसलोक हॉस्पिटलमध्ये गोंडस बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे त्यांचा जन्मही जसलोकमध्येच झाला होता.

'टेस्ट ट्यूब बेबी' बनला पिता, एकाच रुग्णालयात जन्म झाला बापलेकाचा
test tube babyImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 12:51 PM

मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : 30 वर्षांपूर्वी मुंबईतल्या चेंबूर येथील एका दाम्पत्याने मुंबईतील रुग्णालयात टेस्ट ट्यूब बेबीला जन्म दिला होता. आता हे टेस्ट ट्यूब बेबी लव्ह सिंह देखील पिता बनले आहे. विशेष म्हणजे लव्ह सिंह यांची पत्नी हरलीन कौर हीने त्याच हॉस्पिटलमध्ये आपल्या बाळाला जन्म दिलाय जेथे त्याचे वडील लव्ह सिंह टेस्ट ट्यूब बेबी तंत्राने जन्मले होते. मुंबईच्या प्रसिद्ध जसलोक रुग्णालयात टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने लव्ह यांचा जन्म झाला होता. त्यावेळी हे तंत्रज्ञान खूपच नवे होते. त्यांच्या आठ वर्षांअगोदर भारताच्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी हर्षा चावडा शाह यांचा जन्म झाला होता. परंतू लव्ह यांचा जन्म इंट्रासाईटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन ( ICSI ) तंत्राने झाला होता. आणि ते त्याहून प्रगत तंत्रज्ञान म्हटले जाते.

लव्ह सिंह आता प्रॉपर्टी एडव्होकेट आहेत. 28 जानेवारी रोजी त्यांच्या पत्नीने जसलोक रुग्लालयात बाळाला जन्म दिला आहे. देशातील ICSI तंत्रज्ञानाला आणणाऱ्या डॉ. फिरोजा पारिख यांच्या देखरेखी खाली या बाळाचा जन्म झाला. लव्ह यांच्या पत्नी गर्भधारणा नैसर्गिक झाली होती. परंतू डॉ. पारिख यांच्या ऋृणानुबंध जुळल्याने त्यांच्या देखरेखी खाली बाळाचा जन्म झाला. गुरुवारी लव्ह सिंह यांच्या पत्नीला घरी देखील सोडण्यात आले.

डॉ. पारीख साल 1989 मध्ये येल युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेऊन भारतात परतल्या होत्या. भारतात त्यांनी आयसीएसआय तंत्रज्ञानावर संशोधन केले. त्यातून एका स्पर्मद्वारे गर्भधारणेचे तंत्रज्ञान आणले. आम्हा स्पर्म एगमध्ये टाकण्यासाठी चार वर्षांचा काळ लागला होता. तो माणसाच्या केसांहूनही अनेक पटीने सुक्ष्म असतो. लव्ह सिंह आयसीएसआय तंत्राने जन्म होणारे दक्षिण आशियातील पहिले व्यक्ती आहेत. साल 2016 मध्ये देशातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी हर्षा चावडा देखील आई बनली होती. त्यांनी देखील आपल्या बाळाला जसलोकमध्येच जन्म दिला होता. हर्षा या देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म 1986 मध्ये झाला होता. प्रसुती शास्रातील मैलाचा दगड ठरलेल्या इन व्हायट्रो फर्टीलायझेशन तंत्राचा वापर करून डॉ. इंदिरा आहुजा यांनी हर्षाला जन्म दिला होता.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.