Mission Zero | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन, मिशन झिरो मोहिम नेमकी काय?

मिशन झिरो या उपक्रमाचा शुभारंभ महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या हस्ते करण्यात (Mumbai BMC Mission Zero Covid Pandemic) आला.

Mission Zero | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन, मिशन झिरो मोहिम नेमकी काय?
मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Jun 22, 2020 | 4:03 PM

मुंबई : मुंबईत नव्याने निर्माण झालेल्या कोरोनाच्या रेडझोनमध्ये मुंबई महापालिका मिशन झिरो मोहिम राबवणार आहे. या अंतर्गत मुंबई उपनगरातील बोरिवली, दहिसर, मालाड, कांदिवली, भांडूप, मुलुंड या भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेने नवा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. (Mumbai BMC Mission Zero Covid Pandemic)

या भागात येत्या दोन-तीन आठवड्यात रुग्णांचा शोध घेण्यासाठी आणि उपाचारासाठी 50 फिरते दवाखाने तयार केले जाणार आहे. या उपक्रमासाठी भारतीय जैन संघटना, क्रेडाई -एमसीएचआय, देश अपनाये, बिल गेटस् फाऊंडेशन या संस्थांची मदत होणार आहे. मिशन झिरो या उपक्रमाचा शुभारंभ महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या हस्ते करण्यात आला. अंधेरीच्या शहाजीराजे क्रिडा संकुल या ठिकाणी या मोहिमेचा शुभारंभ झाला.

महापालिका आयुक्त काय म्हणाले?

“कोरोनाच्या स्थितीबाबत सर्व अभ्यास राज्यसरकारमध्ये काम करत असताना केला होता. त्यामुळे पावसाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, असा आम्हालाही अंदाज आहे. त्यामुळे आम्ही बेडची क्षमता वाढवत आहोत,” अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

“पालिकेने 750 रुग्णावाहिका तयार केल्या आहेत. काही दिवसांपासून लॅबबाबत गोंधळ होता. अनेकांना टेस्टनंतर 24 तासात रिपोर्ट मिळत नव्हते. त्याकडे लक्ष दिल्यानंतर आता 24 तासात रुग्णांना रिपोर्ट मिळत आहेत,” अशी माहिती चहल यांनी दिली.

“सुरुवातीला फक्त 3000 बेड होते. मात्र आता त्याची संख्या 12 हजार झाली आहे. गोवंडी, मानखुर्दमध्ये आपण चेस द व्हायरस ही मोहीम राबवली. त्यामुळे या ठिकाणचा Ratio कमी झाला आहे. धारावीपेक्षा गोवंडी, मानखुर्द या ठिकाणी कोरोना आटोक्यात आणणं हे चॅलेंज होतं. मात्र आपण ते केलं,” असेही चहल म्हणाले.

“सध्या यावर औषध नाही. त्यामुळे हे झिरो होणार नाही. पण आपण प्रमाण कमी करण्याचं काम करत आहोत. येत्या 30 जूनपर्यंत योग्य नियंत्रण करु,” अशा विश्वासही चहल यांनी वर्तवला. (Mumbai BMC Mission Zero Covid Pandemic)

“सध्या उपनगरात जास्त रुग्ण समोर येत आहेत. म्हणून आता याकडे लक्ष देत आहोत. मोबाईल दवाखाने सुरू करत आहोत. जेवढे बाधित आढळतील त्यांची थेट तिथेच टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच आपण होम टेस्टिंग करत आहोत. सर्व दवाखान्यांनासुद्धा आपण टेस्टसाठी मुभा दिली आहे. पण फक्त सर्व रिपोर्ट पालिकेकडे दिले पाहिजे, ही अट घातली आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

“त्याशिवाय जर उपनगरात एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला. तर आता सोबतच्या 20 लोकांना क्वारंटाईन केलं जाईल. या 50 गाड्यात कोरोना टेस्टची सुविधा पालिका देणार आहेत. डायलिसिसची योग्य सुविधा पुरवत आहोत,” असेही चहल यांनी यावेळी सांगितले.

काय आहे मिशन झिरो मोहिम?

मालाड, बोरिवली, दहिसर, कांदिवली, भांडूप, मुलुंड या परिसरात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या भागात रुग्ण दुपटीचा कालावधी वाढवण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

या विभागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संबंधित परिसरात जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यांना औषधे दिली जाणार आहे. तसेच जे कोणी कोरोना संशयित असतील अशा रुग्णांना त्वरीत वेगळे करुन त्यांची कोविड टेस्ट करण्यात येणार आहे. त्याशिवाय या परिसरात कोरोनाविषयीची जनजागृती केली जाणार आहे.

  • मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 36 दिवसांवरुन 50 दिवसांवर नेणे हे लक्ष्य आहे.
  • मुंबई महानगरपालिकेकडून नियोजनबद्ध प्लॅन
  • या महत्त्वाकांक्षी उपक्रमात 50 फिरते दवाखाने असणार
  • फिरत्या दवाखान्यात कोरोना टेस्टची सुविधा
  • विविध भागात जाऊन प्राथमिक तपासणी आणि चाचणी करुन बाधितांचा शोध घेणार
  • पुढील 2 ते 3 आठवडे हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जाणार
  • चेस द व्हायरस ही मुंबईत वापरलेली मोहिम उपनगरात वापरली जाणार
  • मुंबई उपनगरामध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा वेग वाढला आहे, यामुळे तो नियंत्रणात येईल.
  • मुंबई महापालिका, भारतीय जैन संघटना मिळून राबवला जाणार आहे.

संबंधित बातम्या : 

नवदाम्पत्याकडून कोव्हिड सेंटरला 50 बेड, लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत रुग्ण सेवेसाठी मदत

Corona Update | नवी मुंबईत दिवसभरात 128 नवे कोरोनाबाधित, बाधितांचा आकडा 4 हजार 189 वर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.