टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | अयोध्येत देशाचं सैन्य घुसवलं तरी राज ठाकरेंना पाय ठेवून देणार नाही म्हणणारे बृजभूषण सिंह आता म्हणतायेत…

| Updated on: Apr 11, 2023 | 2:41 AM

खासदार बृजभूषण सिंह राज ठाकरेंच्या मनसे स्वागतासाठी तयार झाले आहेत. राज ठाकरेंनी जर सांगितलं तर त्यांचं अयोध्येत स्वागत करेल असं त्यांनी म्हटलंय.

टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | अयोध्येत देशाचं सैन्य घुसवलं तरी राज ठाकरेंना पाय ठेवून देणार नाही म्हणणारे बृजभूषण सिंह आता म्हणतायेत...
Follow us on

मुंबई : अयोध्येत देशाचं सैन्य जरी घुसवलं तरी राज ठाकरेंना पाय ठेवून देणार नाही, असं म्हणणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह राज ठाकरेंच्या मनसे स्वागतासाठी तयार झाले आहेत. राज ठाकरेंनी जर सांगितलं तर त्यांचं अयोध्येत स्वागत करेल असं त्यांनी म्हटलंय.

भूमिका बदलाचा आरोप फक्त मनसेवरच नाही तर बृजभूषण सिंहावरही होतोय. मात्र यावेळी मनसैनिकांच्या टार्गेटवर बृजभूषण सिंह आहेत. याआधी मी असेपर्यंत राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नसल्याचा प्रण घेणारे बृजभूषण आता राज ठाकरेंच्या स्वागतासाठी आतूर झालेयत त्याचा एक व्हिडीओ मनसे समर्थकांनी शेअर केलाय.

गेल्या सभेत आपल्यामागे लागलं की काय होतं., असं म्हणत राज ठाकरेंनी बृजभूषण सिंहांकडे बोट दाखवलं. देशातल्या काही कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंहावर लैंगिक शोषणाचे आरोप केले., त्याचं पुढे काय झालं याची माहिती अद्याप मिळालेली नाही.,

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना बृजभूषण सिंहांनी चुआपासून अनेक शब्द राज ठाकरेंसाठी वापरले होते. काल त्याच बृजभूषण सिंहांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं हनुमान गढीवर स्वागत केलं. वर्षभरापूर्वी बृजभूषण सिंह आव्हानांवर आव्हान देत होते, तर उत्तर भारतीयांचा कळवळा इतक्या वर्षांनी अचानक कसा बाहेर आला,असा सवाल राज ठाकरे करत होते.

अयोध्या दौरा हा सापळा होता बृजभूषण सिंहांमागे मुंबई आणि दिल्लीतल्या काही नेत्यांची रसद होती, असा करत कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतील. म्हणून राज ठाकरेंनी अयोध्या दौरा लांबणीवर टाकला. मात्र अयोध्या न येऊन राज ठाकरेंनी एकप्रकारे उत्तर भारतीयांची माफीच मागितली, असं बृजभूषण सिंहांचं मत आहे.

गेल्यावेळी जेव्हा राज ठाकरेंचा अयोध्या दौरा निश्चित झाला होता., तेव्हा आदित्य ठाकरेंनीही अयोध्या दौऱ्याचं नियोजन केलं. या वादाचे बॅनर अयोध्येतही झळकले. असली आ रहाँ है, नकली से सावधान असे बॅनर शिवसेनेनं लावले होते. पण यावेळी कोणती शिवसेना असली आणि कोणती नकली हा वाद सुरुय.

तूर्तास आता स्वतः बृजभूषण सिंह अयोध्येत राज ठाकरेंच्या स्वागतासाठी तयार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंचा कधी अयोध्येला जातात., याकडे लक्ष लागलंय.