महाराष्ट्राचे सत्तांतर म्हणजे बॉलीवुडची पटकथा; ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स इलिस यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; इंग्लंडमधील उद्योजकांना गुंतवणुकीचे आवाहन

‘महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाले त्याच्यावर माझे लक्ष होते. एखाद्या बॉलीवूड चित्रपटाचे पटकथा असावी असा तो सत्तांतराचा खेळ रंगत गेला आणि आपण त्याचे हिरो होतात,’ असे उच्चायुक्त इलिस यांनी सांगताच मुख्यमंत्री शिंदे यांनी अतिशय अदबीने, आपण केवळ सामान्य आणि सतत काम करणारा माणूस असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राचे सत्तांतर म्हणजे बॉलीवुडची पटकथा; ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स इलिस यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; इंग्लंडमधील उद्योजकांना गुंतवणुकीचे आवाहन
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 8:15 PM

मुंबईः महाराष्ट्रात उत्तम पायाभूत सुविधा तसेच कुशल मनुष्यबळ असल्याने येथे गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध असून इंग्लंडमधील उद्योजकांनी येथे गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स इलिस (British High Commissioner Alex Ellis) यांच्यासमवेत चर्चेदरम्यान करण्यात आले. भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स इलिस यांनी शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट (Ministry visit) घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी चर्चा करताना अलेक्स इलिस म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तांतर म्हणजे बॉलीवूडची पटकथा आहे, आणि त्याचे हिरो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ब्रिटनच्या मुंबईतील उपउच्चायुक्त कॅथरिन बार्न्स, उपउच्चायुक्तांचे सल्लागार सचिन निकार्गे तसेच राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी राज्यात सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी उपक्रमांबाबत ब्रिटीश उच्चायुक्तांना माहिती दिली.

समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्वास

जागतिक दर्जाच्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्वास आले असून यामुळे विदर्भातील औद्योगिकीकरणास मोठी चालना मिळणार आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्प, बंगळुरू-मुंबई कॉरिडॉर, कोस्टल रोड, गोवा महामार्ग असे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. याचबरोबर 28 टक्क्यांसह महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील आघाडीचे राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि इंग्लंडमधील घनिष्ट संबंध

महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आदींची उपलब्धता आहे. देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. येथे गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना राज्य शासन सर्व ते सहकार्य करणार आहे असे सांगून महाराष्ट्र आणि इंग्लंडमधील घनिष्ट संबंध भविष्यात अधिक दृढ होतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. अलेक्स इलिस यांनी ब्रिटीश शासनाच्यावतीने व्यापार, गुंतवणूक आदींमधील संधींबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

इलिस ‘वडापाव’चे चाहते

ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स इलिस यांना मुंबईचा वडापाव आवडत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या आदरातिथ्यामध्ये वडापावचा आवर्जुन समावेश करण्यात आला. वडापावचा अतिशय आनंदाने आस्वाद घेताना इलिस यांनी इंग्लंडमध्येही वडापाव आता लोकप्रिय होत असल्याचा उल्लेख केला.

शिंदे यांना सुखद धक्का

अलेक्स यांनी हिंदीतून संवाद साधत मुख्यमंत्री शिंदे यांना सुखद धक्का दिला. इंग्लंड आणि महाराष्ट्र राज्याचे शैक्षणिक संबंध वेगाने दृढ होत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. सध्या इंग्लंडचे 20 संशोधन प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे सत्तांतर बॉलीवूडची पटकथा

‘महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाले त्याच्यावर माझे लक्ष होते. एखाद्या बॉलीवूड चित्रपटाचे पटकथा असावी असा तो सत्तांतराचा खेळ रंगत गेला आणि आपण त्याचे हिरो होतात,’ असे उच्चायुक्त इलिस यांनी सांगताच मुख्यमंत्री शिंदे यांनी अतिशय अदबीने, आपण केवळ सामान्य आणि सतत काम करणारा माणूस असल्याचे सांगितले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.