मुंबई : मीरा रोडमध्ये प्रशासनाकडून ‘बेकायदा’ बांधकामांवर बुलडोझर चालवला गेला आहे. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनादरम्यान या भागात हिंसाचार पाहायला मिळाला होता. घटनास्थळावरून समोर आलेल्या दृश्यांमध्ये दोन गट एकमेकांवर दगडफेक करताना दिसत होते. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी रात्रीपर्यंत अनेक जणांना अटक केली होती. श्री राम शोभा यात्रा मीरा रोडच्या नया नगर परिसरातून जात असताना हिंसाचार झाला होता.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री पोस्ट केले की, “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही”.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले की, “मीरा-भाईंदरच्या नया नगर भागात घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेण्यात आली आहे. सोमवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांच्या सतत संपर्कात होतो. सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अन्य आरोपींची ओळख पटवली जात आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणीही खपवून घेतला जाणार नाही.
पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी माहिती दिली की, रविवारी रात्री 11 वाजता हिंसाचार सुरू झाला, “जेव्हा समाजातील काही लोक तीन-चार वाहनांमध्ये घोषणाबाजी करताना दिसले.”
पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली की, “दोन्ही समुदायातील काही लोकांमध्ये वाद सुरू झाला. परिस्थिती आणखी बिघडत असल्याचे पाहून पोलिसांचे वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी काही लोकांना ताब्यात घेतले.”
Bulldozer action taken
Thank you Government of Maharashtra and Mumbai police https://t.co/a960t8zvQA— ᴅᴇʙᴀᴊɪᴛ ꜱᴀʀᴋᴀʀ🇮🇳 (@debajits3110) January 23, 2024
महाराष्ट्रात उत्तर प्रदेश पॅटर्न राबवली जात असल्याची चर्चा सुरु आहे. मोठ्या प्रमाणात दंगल विरोधी पथकाच्या उपस्थितीत ही कारवाई पोलिसांकडून सुरु आहे. आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले आहे. या आरोपींच्या घराजवळ जे अवैध बांधकाम केले गेले होते त्याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. मोठे वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित आहे. मोठ्या प्रमाणात जेसीबी या ठिकाणी मागवण्यात आले आहेत.