Cargo Boat Drown Video : मुंबईजवळ एका बोटीला जलसमाधी, तिघांना वाचवण्यात यश, मोठं आर्थिक नुकासान
या बोट दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली नाही. या दुर्घनेतून तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र यात मोठं आर्थिक नुकासान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर बंदरांचं मोठं जाळं आहे अनेक बोटींतून आणि जहाजातून (Ship) मालवाहूक होत असते. यावेळी अनेक दुर्घना (Cargo Boat) घडल्याच्याही बातम्या समोर आल्या आहे. आता पुन्हा अशीच एक घटना घडली आहे. मुंबई (Mumbai) जवळील समुद्रात एक बोट दुर्घटना घडली आहे. बालार्ड पिअर जवळ एका बोटीला अपघाथ होऊन ही बोट बुडाली आहे. ही एक मालवाहू बोट असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या बोट दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली नाही. या दुर्घनेतून तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र यात मोठं आर्थिक नुकासान झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बोट बुडतानाचा व्हिडिओ व्हायरल
या अपघाताचा आणि बोट बुडतानाचा हा व्हिडिओ पाहिल्यास या अपघाताची दाहकता लक्षात येते. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्याअंगाचा थरकाप उडू शकतो. ही दुर्घटना घडत असताना शेजारी असणाऱ्या एका बोटीवरील कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ शूट केला आहे. या बोटीच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाला. आणि त्या मुळे हा अपघात झाला, तात्रिक बिघाडामुळे बोटीमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. काही कळण्याच्या आततच ही बोट समुद्रात बुडाली असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या मालवाहू एकून बोटीवर तीन कर्मचारी होते त्यांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. यातल्या दोघांनी लगेच समुद्रात उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे. त्यानंतर ते शेजारील बोटीत पोहोत पोहोचल्याचा थरार पहायला मिळाला.
अनेकवेळा अशा दुर्घटना
दोघांनी पाण्यात उड्या मारल्या मात्र सुरूवातील एक कर्मचारी बोटीवरच थांबला होता. मात्र बोट बुडतेय जीव वाचवण्यासाठी आता काहीच उरलं नाही हे लक्षात येताच त्याही कर्मचाऱ्याने सुमुद्रता उडी घेतली आणि आपला जीव वाचवाला आहे. हा दुर्घटनेचा थरार अनेकांच्या अंगावर काटा आणणार आहे. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियासहीत इतर माध्यमात व्हायरल होत आहे. अशा घटना टाळण्यासाठी बोटींची वेळीच आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच वादळामुळे मोठी जहाजं समुद्रात बुडून त्यांना जलसमाधी मिळाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेतच. आता पुन्हा या थराराने त्याही घटनांची आठवण करुन दिली आहे. या दुर्घनेने पुन्हा एकदा नौदल अलर्ट मोडवर आले आहे, आणखीही काही महत्वाची माहिती या दुर्घटनेबाबत समोर येण्याची शक्यता आहे.