गाजरांची शौचालयाच्या पाण्यात पायाने मळणी, व्हिडीओ पाहून धक्का बसेल
शौचालयाच्या पाण्यात ही गाजरं (carrot viral video) स्वच्छ केली जातात आणि पुढे छोट्या विक्रेत्यांसह ग्राहकांना विकली जातात. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आल्याने हा प्रकार उघड झालाय. विशेष म्हणजे गाजर धुणारे कर्मचारी पायाने गाजर धुतात. वाशी एपीएमसीमधील (Vashi APMC) हा प्रकार असल्याचं समोर आलंय.
नवी मुंबई : गाजर हे आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं आणि डॉक्टरही चांगल्या आरोग्यासाठी गाजर (carrot viral video) खाण्याचा सल्ला देतात. केशरी गाजर हे वर्षभर सहजरित्या उपलब्ध होतं. पण हे गाजर (carrot viral video) विक्रेत्यांपर्यंत येताना ते कोणत्या पद्धतीने येतं हे पाहिलं तर तुम्हाला गाजर खावंसं वाटणार नाही. कारण, शौचालयाच्या पाण्यात ही गाजरं (carrot viral video) स्वच्छ केली जातात आणि पुढे छोट्या विक्रेत्यांसह ग्राहकांना विकली जातात. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आल्याने हा प्रकार उघड झालाय. विशेष म्हणजे गाजर धुणारे कर्मचारी पायाने गाजर धुतात. वाशी एपीएमसीमधील (Vashi APMC) हा प्रकार असल्याचं समोर आलंय.
थंडी सुरु झाल्यानंतर लाल गाजर बाजारात मिळतं. पण हल्ली केशरी गाजर वर्षभर उपलब्ध असतं. दुधाची तहान ताकावर यानुसार हे केशरी गाजर बाजारात खपवले जातात. नवी मुंबईतील वाशी एपीएमसीमध्ये (Vashi APMC) घाऊक भाजीपाला बाजारात दररोज दहा ते बारा गाड्या भरुन केशरी गाजर येतात. नाशिक, पुरंदर, राजस्थान, मध्य प्रदेश या भागातून ही गाजरे येतात. गाजर एपीएमसीमध्ये येतं तेव्हा ते चिखलाने माखलेलं असतं. पण ते धुण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते याचा एक व्हिडीओ समोर आलाय.
गाजर धुण्यासाठी ते पहिल्यांदा पाण्याच्या गोल टाकीत ओतलं जातं. त्यात पाणी भरलं जातं आणि गाजरांना भिजू दिलं जातं. गाजर भिजलं की चिखलही मोकळा होतो. मग त्या टाकीत एक माणूस उतरतो आणि पायाने त्या गाजरांना मळायला सुरुवात करतो.
गाजरासोबत टाकीत उतरलेली व्यक्तीही पाण्यात उभा असते. गाजर भिजवण्यासाठी शौचालयाला वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर केला जात असल्याचंही समोर आलंय. गाजर ही खाण्याची वस्तू आहे, जी हातांऐवजी पायाने साफ केली जाते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जातोय.
मुंबईत मोठ्या प्रमाणात गाजर ज्युस विकलं जातं. या ज्युससाठी वर्षभर केशरी गाजरच वापरलं जातं. पण हे गाजर ज्या ठिकाणाहून येतंय, त्या ठिकाणी गाजरावर कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते ते पाहून आता ग्राहाकंनाही धक्का बसलाय. त्यामुळे केशरी गाजराचं ज्युस पित असाल किंवा खाण्यासाठी गाजर खरेदी करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा.
व्हिडीओ पाहा :