CBSE Exam : सीबीएसई बोर्ड दहावी, बारावी दुसऱ्या टर्मची परीक्षा ऑफलाईन, परीक्षेची तारीख काय?

सीबीएसई बोर्डाची 10वी आणि 12वी दुसऱ्या टर्मची परीक्षा ऑफलाईन होणार आहे. ही परीक्षा 26 एप्रिलपासून घेतली जाणार आहे. सीबीएसईकडून लवकरच या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे सीबीएसई कडून 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय झाला होता.

CBSE Exam : सीबीएसई बोर्ड दहावी, बारावी दुसऱ्या टर्मची परीक्षा ऑफलाईन, परीक्षेची तारीख काय?
सीबीएसई परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेटImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 10:27 PM

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) 10वी आणि 12वी दुसऱ्या टर्मची परीक्षा (Second term exam) ऑफलाईन होणार आहे. ही परीक्षा 26 एप्रिलपासून घेतली जाणार आहे. सीबीएसईकडून लवकरच या परीक्षेचं वेळापत्रक (Exam Schedule) जाहीर करण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे सीबीएसई कडून 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय झाला होता. यातील 10 ची टर्म-1 बोर्ड परीक्षा 17 नोव्हेंबरला महत्वाच्या विषयांसाठी आणि 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान सोप्या विषयांसाठी घेण्यात आली होती. त्याच वेळी, 12वी वर्गाच्या सोप्या विषयांच्या परीक्षा 16 नोव्हेंबर आणि प्रमुख विषयांच्या परीक्षा 01 ते 22 डिसेंबर 2021 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. बोर्डाकडून या परीक्षेचे निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र ते लवकरच जाहीर होतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

टर्म- 2 च्या परीक्षेचं स्वरुप काय असणार?

टर्म – 2 परीक्षेत विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव आणि सब्जेक्टिव अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातील. टर्म – 1 परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाचे प्रश्न विचारण्यात आले होते. बोर्डाकडून परीक्षेसाठी सॅम्पल पेपरचाच फॉरमॅट फॉलो केला जाईल. हे सॅम्पल पेपर मागील महिन्यात सीबीएसईच्या अकॅडमिक वेबसाईटवर जारी केला होता. वेळापत्रक लवकरच बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.nic.in वर जारी केलं जाणार आहे. सीबीएसई पहिल्यांदाच 10 वी आणि 12वीची अंतिम परीक्षा दोन टर्ममध्ये आयोजित करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मागील वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून परीक्षा आयोजित करण्यात आली नव्हती. त्यामुळे निकालासाठी एख वैकल्पिक मूल्यांकन करण्यात आलं होतं.

सीबीएसईच्या प्रॅक्टिकल परीत्रा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाऊ शकतात. मात्र, बोर्डाकडून अद्याप प्रॅक्टिकल परीक्षेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बऱ्याच काळापासून विद्यार्थी दुसऱ्या टर्मच्या लेखी परीक्षेची वाट पाहत आहेत.

इतर बातम्या :

PM Narendra Modi : ‘पाचही राज्यात भाजपचीच लाट’, नरेंद्र मोदींचा दावा! वाचा पंतप्रधानांच्या मुलाखतीतील 5 महत्वाचे मुद्दे

पुणेकरांना मोठा दिलासा! मिळकत करामध्ये वाढ न करण्याचा महापालिकेचा निर्णय

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.