माहुल पंपिंग स्टेशनसाठी केंद्र सरकारने त्वरित जागा द्यावी; खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे मागणी

खासदार शेवाळे यांनी जे पत्र दिले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुसळधार पावसात दरवर्षी मुंबईतील वडाळा, सायन, गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, चेंबूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होते. या सखल भागातील पूरसदृश्य परिस्थिती रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने काही वर्षांपूर्वी माहुल पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

माहुल पंपिंग स्टेशनसाठी केंद्र सरकारने त्वरित जागा द्यावी; खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे मागणी
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 7:12 PM

मुंबई: मुंबईत पावसाळ्यात (Mumbai Rain) होणाऱ्या पुर परिस्थितीला रोखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकणाऱ्या माहुल पंपिंग स्टेशनचे काम जागेअभावी अद्याप सुरू होऊ शकलेले नाहीत. या प्रकल्पासाठी वडाळा येथील सॉल्ट पॅन डिपार्टमेंटची जागा केंद्र सरकारने त्वरित मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांच्याकडे केली आहे. पंपिंग स्टेशनसाठी ही जागा मिळावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपलिकेच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत.

खासदार शेवाळे यांनीही याविषयी केंद्रीय मंत्र्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार केला होता. आता पुन्हा एकदा या विषयात लक्ष घालून केंद्र सरकारकडून जागा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार शेवाळे यांनी मंत्र्यांना लेखी निवेदन दिले आहे.

पाणी साचून जनजीवन विस्कळीत

खासदार शेवाळे यांनी जे पत्र दिले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुसळधार पावसात दरवर्षी मुंबईतील वडाळा, सायन, गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, चेंबूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होते. या सखल भागातील पूरसदृश्य परिस्थिती रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने काही वर्षांपूर्वी माहुल पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र, हे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक असलेली जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते.

सॉल्ट पॅनची जागा देण्याची मागणी

हे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी खासगी विकासकाची जागा वापरण्याचाही पर्याय पालिकेने चाचपडून पाहिले आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे या जागेवर देखील प्रकल्प उभा राहू शकला नाही. म्हणून, आता पुन्हा एकदा केंद्राच्या सॉल्ट पॅन डिपार्टमेंटची जागा या प्रकल्पासाठी उपलब्ध व्हावी अशी पालिकेची मागणी आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.