मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : मुंबईतलं दादर रेल्वे स्थानक सर्वात रहदारीचं असं रेल्वे स्थानक आहे. लाखो प्रवासी दररोज या रेल्वे स्थानकावर येतात. या रेल्वे स्थानकावरुन प्रवाशी वेगवेगळ्या मार्गाने जातात. विशेष म्हणजे दादर हे एकमेव असं रेल्वे स्थानक आहे जिथे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे स्थानकाचे प्रवासी जोडले जातात. या रेल्वे स्थानकावरुन आपण पश्चिम रेल्वे मार्गाने जाऊ शकतो. तसेच याच रेल्वे स्थानकावरुन आपण मध्य रेल्वे मार्गाने जाऊ शकतो. या रेल्वे मार्गाने आपण गुजरातला जाऊ शकतो. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकापासून ते अंधेरी, बोरीवली, वसई, विरार आणि पुढे गुजरातला जाऊ शकतो. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या इथे पकडता येतात.
दादर रेल्वे स्थानकावरुन मुंबईतल्या सर्वात महत्त्वाच्या अशा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला आपल्याला जाता येतं. तसेच या मार्गाने आपण कुर्ला रेल्वे स्थानकाला जावून हार्बर मार्गाने अगदी पनवेल ते चुनाभट्टी अशा मार्गाने प्रवास करु शकतो. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे रेल्वे स्थानकही हार्बर रेल्वे मार्गाला जोडतो. त्यामुळे या रेल्वे स्थानकावरही आपण दादर रेल्वे स्थानकावरुन जाऊ शकतो.
याशिवाय दादर रेल्वे स्थानकावरुन कल्याण, कसारा, खोपोलीला जाऊ शकतो. कल्याणच्या पुढे दोन वेगळे मार्ग होतात. एक मार्ग नाशिकच्या दिशेला जातो. तर दुसरा मार्ग पुण्याच्या दिशेला जातो. हे दोन्ही मार्ग महत्त्वाचे आहेत. अनेक हजारो किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचा प्रवास याच मार्गातून सुरु होतो. त्यामुळे दादर रेल्वे स्थानक अतिशय महत्त्वाचं असं स्थानक आहे.
दादर रेल्वे स्थानक महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे. इथे नव्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एक गोंधळ होतो. तो म्हणजे एखादा प्रवासी मध्य रेल्वे मार्गाने प्रवास करुन दादरला उतरला असेल आणि त्याला अंधेरी जायचं असेल तर नेमकं कोणत्या प्लॅटफॉर्मला जायचं? याबाबत शंका निर्माण होते. अनेकांना दोन्ही मार्गाचे 1 ते 7 असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म क्रमांक असतात असं माहिती नसतं. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडतो. त्यामुळे अखेर रेल्वे प्रशासाने या गोष्टीचा विचार करुन ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
रेल्वे प्रशासनाने दादर रेल्वे स्थानकाबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला आता सरसकट अनुक्रमे क्रमांक देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. हे सर्व बदल 9 डिसेंबर पासून होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 7 हे पश्चिम रेल्वेसाठी असतील. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 8 ते 14 हे मध्य रेल्वेसाठी असतील. प्रवाशांचा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.