Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, करी रोडजवळ तांत्रिक बिघाड, कामावर जाणाऱ्यांचा खोळंबा
Central Railway : करी रोड लोकल स्टेशनवर लोकल थांबल्याचं दिसून येतंय. सिग्नल न मिळाल्यानं रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कामावर जाणाऱ्यांचा खोळंबा झालाय. तांत्रिक बिघाड असल्याची माहिती आहे.
मुंबई : मध्य रेल्वेची (Central Railway) वाहूतक विस्कळीत झाल्याचं वृत्त आलंय. हा खोळंबा करी रोडजवळ झाला आहे. याठिकाणी तांत्रिक कारणामुळे बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. या बिघाडीमुळे वाहतुकीचा खेळंबा झाला असून कामावर जाणाऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो आहे. सीएसएमटीकडे (CSMT) जाणाऱ्या लोकलमध्ये (Local) तांत्रिक बिघाड झाला आहे. करी रोड लोकल स्टेशनवर लोकल थांबल्याचं दिसून येत आहे. सिग्नल न मिळाल्यानं रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कामावर जाणाऱ्यांचा खोळंबा झाला आहे. करी रोड स्टेशनजवळ हा तांत्रिक बिघाड झाला आहे. सिग्नल न मिळाल्यानं करी रोडवर लोकल थांबल्या आहेत. यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं दिसतंय. दरम्यान, यावर सेंट्रल रेल्वेकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही.
कामावर जाणाऱ्यांचा खोळंबा
सकाळी लोकलनं मोठ्या प्रमाणात मुंबईकर कामावर जातात. आता याच वेळेत खोळंबा झाल्यानं मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेन करी रोडवर थांबल्या आहेत. महिला प्रवाशांनी देखील यावेळी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारे वाहतुकीचा खोळंबा झाल्यास आम्हाला कार्यालयात पोहचायला उशिर होतो, असं या महिला प्रवाशांचं म्हणनं होतं.
वाहतूक कुठे खोळंबली?
करी रोड लोकल स्टेशनवर लोकल थांबल्याची सध्या माहिती आहे. याठिकाणी सिग्नल न मिळाल्यानं रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती आहे. कामावर जाणाऱ्यांचा खोळंबा झाला असून अजून इतर कोणत्या लोकल स्टेशनवर वाहतूक ठप्प झाली आहे, याची माहिती नाही.
वाहतूक खोळंबण्याचं कारण काय?
करी रोड लोकल स्टेशनवर तांत्रिक कारणामुळे बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याती माहिती आहे. बिघाड दूर करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर करी रोडवर प्रवासी थांबले आहेत.
प्रवाशांचा संताप
सकाळी नोकरीवर जाणाऱ्यांची गडबड असते. यातच प्रवाशांना लोकलच्या तांत्रिक बिघाडामुळे मागच्या तासाभरापासून करी रोडवर उभ रहावं लागत आहे. यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे कार्यालयात जाण्यात उशिर होत असल्याचं देखील प्रवाशांचं म्हणनं आहे. मागच्या बऱ्याच वेळेपासून आम्ही याठिकाणी लोकल कधी निघणार याची वाट पाहत असल्याची माहिती एका प्रवाशानं दिली आहे. आता यावर लवकरात लवकर बिघाड दूर करून लोकलची वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.