Central railway : मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत, लोकल काही मिनिटे उशिरानं, वीजप्रवाह पूर्ववत
मुंबईत पडलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central railway) मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. वीजप्रवाह खंडित (Power outage) झाल्यानं मध्य रेल्वे मार्गावरील लोकल (Local) सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला. तर नोकरदार वर्गाला याचा त्रास सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेला जाणाऱ्या गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरानं धावत असल्याची माहिती त्यावेळी होती . यामुळे नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी आज वेळ लागला. अनेक ठिकाणी प्रवासी रेल्वेची वाट पाहत होते. ठाणे आणि कांजूरमार्ग स्थानकादरम्यान वीजप्रवाह काही काळासाठी खंडित झाल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला होता. आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याची माहिती आहे. सकाळीच लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत.
लोकल वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पडलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर आता मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने सर्वच स्थानकांवर गर्दी झाली असून प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी आज वेळ लागत असल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी प्रवासी रेल्वेची वाट पाहतायेत. ठाणे आणि कांजूरमार्ग स्थानकादरम्यान वीजप्रवाह काही काळासाठी खंडित झाल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला. सकाळीच लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
वाहतूक व्यवस्था सुरळीत
नाहूर स्थानकाच्या जवळपास पावसामुळे सिग्नल यंत्रणेमध्ये सकळी साडेसहा वाजता बिघाड झाल्याने रेल्वे सेवा खोळंबली होती. काही वेळा नंतर सिग्नल यंत्रणा नीट झाल्यानं पुन्हा वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र, मध्य रेल्वेची वाहतूक काही मिनिटे उशिराने धावत आहे.