Mega Block : आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, पाहा दिवसभरातलं संपूर्ण वेळापत्रक
मध्य रेल्वेच्या (Central Railway) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मुंबई विभागातील उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन स्लो सेवा सीएसएमटी (CSMT) आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मुंबई विभागातील उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन स्लो सेवा सीएसएमटी (CSMT) आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहे. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानके आणि पुढे डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप स्लो सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर या लोकल थांबवण्यात येतील.
Sunday Mega block (17.04.2022) updates ?
NO MEGA BLOCK on Mainline b/w CSMT- KALYAN.
However, MEGA BLOCK ON HARBOUR LINE WILL BE OPERATED as announced earlier i.e. CSMT – Chunabhatti / Bandra frm 11.40 am to 4.40 pm & Chunabhatti / Bandra- CSMT frm 11.10 am to 4.10 pm.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 16, 2022
हार्बर मार्गावरील सेवा येथे मेगाब्लॉक दरम्यान बंद असतील
सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी 10.48 ते 4.43 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी सकाळी 10.45 ते 5.13 वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवली जाणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या कालावधीत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कसलाही ब्लॉक नाही
ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि इतर देखभालीसाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान आज मध्यरात्री अप आणि डाऊन जलद मार्गांवर दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत जंबो ब्लॉक घेण्यात येईल. रविवार 17 एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही दिवसाचा ब्लॉक असणार नाही. CPRO सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत अंधेरी-सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील उपनगरीय गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. या संदर्भात सविस्तर माहिती संबंधित सर्व स्टेशनच्या स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे.