Matheran Toy train : माथेरानची राणी आता आलिशान एसी सलून कोच मधून सैर घडविणार, आठ प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी सोफा, प्रसाधनगृह आदी सुविधांची रेलचेल

नेरळ-माथेरान टॉय ट्रेन आणि हा नॅरोगेज रेल्वे मार्ग 100 वर्षांहून अधिक पुरातन आहे, हा मार्ग भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वे मार्गांपैकी एक आहे. या टॉय ट्रेनमधील एसी सलूनमध्ये प्रवास करणे हा एक थ्रिलींग अनुभव असणार आहे.

Matheran Toy train : माथेरानची राणी आता आलिशान एसी सलून कोच मधून सैर घडविणार, आठ प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी सोफा, प्रसाधनगृह आदी सुविधांची रेलचेल
matheran (1)Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 7:00 PM

मुंबई : माथेरानच्या राणीला आता आलिशान वातानुलित सलून कोच जोडण्यात येणार आहे. या मिनीट्रेनचा ( Matheran Toy train ) हा सलून कोच प्रवाशांना आता दिवसाचा किंवा रात्री फॅमिली ( family picnic ) ट्रीपसाठी भाड्याने मिळण्याची सोय प्रवाशांना मिळणार आहे. माथेरानच्या हिल स्टेशनला जाणाऱ्या प्रवाशांच्या मागणीवरून मध्य रेल्वेनेही  ( centralrailway ) नवीन सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नॅरोगेज रेल्वे मार्ग 100 वर्षांहून अधिक पुरातन आहे, हा मार्ग भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वे मार्गांपैकी एक आहे. या टॉय ट्रेनमधील एसी सलूनमधून प्रवास करणे हा एक थ्रिलींग अनुभव असणार आहे.

माथेरान येथील प्रसिद्ध मिनीट्रेनला आठ आसनांची सोय असलेला आरामदायी एसी सलून कोच जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या सलून कोचची नेरळ ते माथेरान असा त्याच दिवसाची राऊंड ट्रीप किंवा संपूर्ण रात्रीच्या मुक्कामासाठी भाड्याने देण्याची सुविधा असणार आहे. या सलून कोचला भाड्याने घेण्यासाठी प्रवाशांना खालीलप्रमाणे भाडे भरावे लागणार आहे.

Timings of train:

Neral to Matheran Trip-A Neral Dep. 08.50 am Matheran Arr. 11.30 am Trip-B Neral Dep. 10.25 am Matheran Arr. 01.05 pm

Matheran to Neral Trip-C Matheran Dep. 02.45 pm Neral Arr. 04.30 pm Trip-D Matheran Dep. 04.00 pm Neral Arr. 06.40 pm

असे असणार आहे भाडे 

त्याच दिवशी संपणारी राऊंड ट्रीप : आठवड्याच्या इतर दिवशी करासह 32,088 रू. विकेण्डसाठी करासह 44,608 रू.

त्याच दिवशी संपणाऱ्या राऊंड ट्रीपसाठी प्रवासी उदा. A+C किंवा B+D अशा फेरीची निवड करू शकतात

ओव्हरनाईट स्टे राऊंड ट्रीप : आठवड्याच्या इतर दिवशी 32,088/- आणि प्रती प्रवासी दर तासाचे मुक्काम शुल्क +  कर 1,500 रू.

विकेण्डसाठी 44,608 रू. +  आणि प्रती प्रवासी दर तासाचे मुक्काम शुल्क + कर 1,800 रू.

ओव्हरनाईट स्टेसह राऊंड फेरीकरीता प्रवासी A किंवा B आणि परतीसाठी C किंवा D फेरीची निवड करू शकतात.

प्रवाशांनी असे भाडे करावे 

इच्छुक प्रवासी आवडत्या योजनेच्या एकूण भाड्याच्या 20 टक्के आगाऊ रक्कम आणि रु. 10000 रूपये डिपॉझीट प्रवासाच्या तारखेच्या सात दिवस अगोदर भरून एसी सलून बुक करू शकतात. उर्वरीत 80 रक्कम प्रवाशांना प्रवासाच्या तारखेच्या ४८ तासाआधी भरावी लागेल. अन्यथा बुकींग रद्द समजली जाईल आणि रिफंड दिला जाणार नाही.

प्रवासी नेरळ स्टेशनमास्तर मध्य रेल्वेच्या कोणत्याही जवळच्या रेल्वे स्थानक मास्तरांच्या कार्यालयात युपीआय, पीओएस किंवा कॅशद्वारे बुकींग करता येईल. नेरळ स्टेशन मास्तरांशिवाय इतर स्टेशनात बुकींग केल्यास पैसे भरल्याची पावतीचा क्रमांक डिपॉझिट भरण्याआधी नेरळ मास्तरांना कळवावा असे मध्य रेल्वेने स्पष्ठ केले आहे.  इतर चौकशी नेरळ चीफ बुकींग सुपरवायझर कडे करावी.

नेरळ-माथेरान टॉय ट्रेन आणि हा नॅरोगेज रेल्वे मार्ग 100 वर्षांहून अधिक पुरातन आहे, हा मार्ग भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वे मार्गांपैकी एक आहे. या टॉय ट्रेनमधील एसी सलूनमध्ये प्रवास करणे हा एक थ्रिलींग अनुभव असणार असून निसर्ग जवळून पाहण्याची आणि माथेरानच्या नैसर्गिक वातावरणात मन रमविण्याची प्रवाशांना संधी मिळणार आहे.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.