Chagan Bhujbal : मी तर सर्व अंगावर परफ्यूम मारून, सेंट मारून जातो, छगन भुजबळ यांचा तानाजी सावंत यांना टोला

Chagan Bhujbal Attack on Tanaji Sawant : राष्ट्रवादीला महायुतीत घेतल्यामुळे नुकसान झाल्याची चर्चा लोकसभेनंतर रंगली होती. त्यानंतर विधानसभेच्या तोंडावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला. त्यावर मी तर सर्व अंगावर परफ्यूम मारून, सेंट मारून जातो,असा टोला भुजबळांनी सावंतांना लगावला.

Chagan Bhujbal : मी तर सर्व अंगावर परफ्यूम मारून, सेंट मारून जातो, छगन भुजबळ यांचा तानाजी सावंत यांना टोला
छगन भुजबळ यांची तानाजी सावंतांवर टीका
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 3:13 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्यामुळे महायुतीचे नुकसान झाले अशा कुरबुरी लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतून सुरु झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पण यावर तोंडसूख घेतले. त्यानंतर विधानसभेच्या तोंडावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्याने उलट्या होतात, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर मी तर सर्व अंगावर परफ्यूम मारून, सेंट मारून जातो,असा टोला भुजबळांनी सावंतांना लगावला. विरोधक कोणत्याही गोष्टीवर विरोध करणारच. ते संधी पाहत असतात ना. जरा काही झालं तर सुरू. पण या सर्व गोष्टीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पडदा टाकला आहे, असे सांगायला ते विसरले नाहीत.

मुख्यमंत्र्‍यांनी त्यांना गोळी दिली

मी तर सर्व अंगावर परफ्यूम मारून, सेंट मारून जातो. एकदम. कशा उलट्या होईल. होत असतील तर गोळीही असते. पूर्वी लहानपणी एसटी स्टँडवर गोळी खाल्ली तर उलटी होणार नाही. मला नाही वाटत असं असेल. मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंताना गोळी दिली असेल, असा टोला भुजबळांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

तीनही पक्ष एकत्र

कुणाला पटेल, कुणाला नाही पटणार. पण वास्तव काय. तिघे एकत्र आहेत. ज्यावेळी अशा घडामोडी होतात. इकडचे पक्ष तिकडे, तिकडचे इकडे जातात. तेव्हा एखादा पक्ष तयारी करत असतो. तेव्हा अजितदादा इकडे बसले आणि तिथे त्यांचा आमदार असेल तर त्याची संधी जाते,. त्यामुळे तो एक तर विरोधात बोलतो. किंवा दुसरीकडे जाऊन तो लढतो. त्याला लढायचंच असतं. त्यांना वाटतं आपण पुढच्या वर्षी निवडून येईल. पण पुढच्या वर्षी त्यांचं अलायन्स झालेलं असतं. हे वाढणार. निवडणुकीपर्यंत इकडचे तिकडे, तिकडचे इकडे येणार. आरोप केले जाणार. विरोधकही वाट पाहत असतात. चांगला उमेदवार दिसला तर ते सोबत घेतात, असे भुजबळ म्हणाले.

सिंपथी अमूक तमूक हे लोकसभेत होऊन गेलं. ही राज्याची निवडणूक आहे. लोकसभेच्यावेळच्या गोष्टी,. प्रचाराच्या गोष्टी, विषय वेगळे होते. आता विधानसभेचे विषय वेगळे असतील. नवीन विषय ते काढतील. नवीन खास विरोधकांच्या हाती लागलं नाही. महिना दोन महिना आहेत. ते काही ना काही काढतील.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.