लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग बंद असतानाही सक्तीने बिल वसुली : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र सरकारने उद्योजकांना कवडीचीही मदत केली नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग बंद असतानाही सक्तीने बिल वसुली : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 6:57 PM

मुंबई : “कोविड काळात औद्योगिक क्षेत्राला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने उद्योजकांना भरीव मदत केली. पण महाराष्ट्र सरकारने उद्योजकांना कवडीचीही मदत केली नाही,” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पुण्यात आयोजित भाजप उद्योजक आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते (Chandrakant Patil criticize Thackeray Government on Industrial Bill during Lockdown).

चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोविड काळात औद्योगिक क्षेत्राला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या. उद्योजकांना आपले रिटर्न्स फाईल करण्यासाठी मुदतवाढ दिली. त्याचबरोबर कर्जावरील व्याज माफ करुन मोठा दिलासा दिला. पण राज्य सरकारने उद्योजकांना कवडीचीही मदत केली नाही. लॉकडाऊनमध्ये सर्व इंडस्ट्री बंद असतानाही त्यांच्याकडून पाणीपट्टी वसुल केली. वीजेचा वापर झालेला नसतानाही सक्तीने बिले वसूल केली.”

“राज्य सरकारने विविध कर वसूल केले. मात्र राज्य सरकारने रिक्षावाले, फेरीवाले, उद्योजक कोणालाही मदत केली नाही. मग कोविडमध्ये सरकारने केलं काय?” असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला.

कोविड काळातील उद्योजकांचे वीजबिल आणि पाणीपट्टी माफ करण्यासाठी आठ ते सव्वा आठ हजार कोटींची गरज आहे. उद्योग क्षेत्राची पाणीपट्टी आणि वीज बिल माफ व्हावीत यासाठी उद्योग आघाडीने राज्य सरकारकडे मागणी करावी, अशी सूचनाही त्यांनी उद्योजकांना केली.

या बैठकीला भाजप प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, उद्योग आघाडीचे प्रदेश संयोजक प्रदीप पेशकार, सहसंयोजक सुधीर धुत्तेकर, अर्चना वाणी, पुणे शहर संयोजिका अमृता देवगांवकर, पश्चिम महाराष्ट्र संयोजक संजय अरणके यांच्यासह उद्योग आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

भाजपनं हातगुण, पायगुण पहात रहावा, ती त्यांची संस्कृती, आमचा कर्तुत्वावर विश्वास : भाई जगताप

मनसेत अमराठी नेत्यांचा सहभाग चांगली गोष्ट, युती शक्य, पण… चंद्रकांतदादांनी अट सांगितली

‘गिर गये तो भी टांग उपर’, विनायक राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

व्हिडीओ पाहा :

Chandrakant Patil criticize Thackeray Government on Industrial Bill during Lockdown

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.