उद्धव ठाकरे, शरद पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू; चंद्रकांत पाटलांचा इशारा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावर भाष्य करत राजीनाम्याची मागणी केलीय.
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावर भाष्य करत राजीनाम्याची मागणी केलीय. धनंजय मुंडे स्वतःच आपली चूक झाली हे कबूल करुन राजीनामा देतील. त्यांनी राजीनामा दिला नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं (Chandrakant Patil demand resignation of Dhananjay Munde on rape allegations).
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपींची चौकशी होईलच. पण मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्या कबुली जबाबावर कुणीही आरोप केलेले नाही. धनंजय मुंडे यांचे 15 वर्षे महिलेशी संबंध होते. त्या महिलेपासून त्यांना दोन मुले आहेत. त्या मुलांना मुंडेंचं नाव दिलं गेलं आहे. महिलेच्या बहिणीने मुंडेंवर बळजबरी केल्याची तक्रार केली आहे. याबाबत पोलिसांनी शाहनिशा करावी. त्यात आम्हाला पडायचं नाही. पण जे धनंजय मुंडेंनी मान्य केलं आहे. नैतिकता आणि कायदा या दोन्हींच्या चोकटीत न बसणारी गोष्ट केल्यानंतर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या पोस्टवर त्यांनी राहायचं की नाही? ते अतिशय संवेदनशील आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकवेळा अशाप्रकारचे आरोप झाल्यानंतर त्या त्या वेळेला मंत्र्यांनी स्वत: हून राजीनामे दिलेले आहेत.”
“मुंबई विद्यापीठातील मार्क वाढवण्याबाबतचं प्रकरण तुम्हाला आठवत असेल. धनंजय मुंडे यांनी स्वत: निर्णय घ्यायला हवा की, इतक्या मोठ्या पदावर राहिल्यानंतर इतकी मोठी घटना आपल्यासोबत घडल्यानंतर आपण इतक्या महत्त्वाचा पदावर राहायला नको. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. पवार साहेबांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. हे राजीनामे नजिकच्या काळात झाले नाहीत, तर भाजप महाराष्ट्रभर आंदोलन करेल,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.
“माणूस म्हणून चूक घडू शकते, पण नैतिकतेने राजीनामा दिला”
चंद्रकांत पाटील म्हणाले, “एक दंडशक्ती, एक अंकुशशक्ती म्हणून काम करायचं हीच भूमिका विरोधी पक्षाला दिलेली आहे. या शक्तीने जे चुकीचं चाललं आहे त्याचा जाब विचारायचं असतो. लोकांनी ती जबाबदारी दिलेली असते. धनंजय मुंडे यांना पहिल्यांदा आवाहन करेल, माणूस म्हणून चूक घडू शकते. पण नैतिकतेने ते कायद्यात बसणार नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.”
ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर
“खूप राजकीय जीवन त्यांना जगायला मिळाले. या राजकीय जीवनात मंत्री न राहता नॉर्मल कार्यकर्ता म्हणून काम करायला वाव आहे. त्यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री आणि पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. नाहीतर भाजप आंदोलन करेल,” असंही चंद्रकांत पाटलांनी नमूद केलं.
हेही वाचा :
… तर धनंजय मुंडेंना शिक्षा व्हावी, चित्रा वाघ आक्रमक
अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे शरद पवार यांच्या भेटीला
नैतिकता महत्त्वाची, धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य
Chandrakant Patil demand resignation of Dhananjay Munde on rape allegations