शरजील उस्मानीला पकडण्यासाठी चंद्रकांत पाटलांची योगी आदित्यनाथांकडे धाव
हिंदू समाजाच्या विरोधात विखारी वक्तव्य करणाऱ्या उस्मानीच्या विरोधात महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने तात्काळ कारवाई करणे आवश्यक होते. | Chandrakant Patil
मुंबई: एल्गार परिषदेत हिंदू समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी याला अटक करण्यासाठी आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना साकडे घातले आहे. शरजील उस्मानी हा उत्तर प्रदेशात लपून बसला आहे. त्याला तातडीने अटक करावी, अशा मागणीचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी योगी आदित्यनाथ यांना पाठवले. (Chandrakant patil sends letter to yogi Adityanath to arrest sharjeel usmani)
एल्गार परिषदेमध्ये मूळ उत्तर प्रदेशचा नागरिक असलेल्या उस्मानीने हिंदू समाजाच्या विरोधात अतिशय प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. त्याच्या या विखारी वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील तमाम हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. शरजील उस्मानी हा उत्तर प्रदेश येथील आजमगढ जिल्ह्यातील सिधारी या गावातील मूळ नागरिक आहे. हिंदू समाजाच्या विरोधात विखारी वक्तव्य करणाऱ्या उस्मानीच्या विरोधात महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने तात्काळ कारवाई करणे आवश्यक होते. पण आज पाच दिवस झाले तरी त्याच्याविरोधात कुठलीच कारवाई महाराष्ट्रातील सरकारने केली नाही. तसेच यापुढेही त्याच्याविरोधात सरकार कारवाई करेल अशी खात्री सध्या वाटत नाही. त्यामुळे हिंदू विरोधात वक्तव्य करणाऱ्या उस्मानीच्या विरोधात आपल्या सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी. जेणेकरुन भविष्यात कुठलीही व्यक्ती कोणताही समाज वा धर्माच्या विरोधात अशाप्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करण्याचे धाडस करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘आम्हाला तुम्ही शिकवू नका, शरजीलवर कारवाई करणार का? ते सांगा’
शरजीलवर कारवाई करायला उशिर का होतोय? खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही आणखी कोणत्या गोष्टींची तडजोड करणार आहात? यावर तुम्ही टीप्पणी कराल, यांच्याकडे सरकार नाही तर झोप लागत नाही. आमचे अतिशय उत्तम कामे चाचली आहेत. व्यवस्थित सेवा, आंदोलने सुरु आहेत. तुम्ही आम्हाला शिकवू नका. दरवेळी सरकार नाही म्हणून झोप येत नाही, असं गुळगुळीत वाक्य म्हणू नका. कारवाई करणार की नाही ते सांगा, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
शिवसेनेच्या ‘जलेबी फाफडा’ डिप्लोमसीवर चंद्रकांत पाटलांची टिप्पणी
गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने ‘जलेबी फाफडा’ डिप्लोमसी आखली. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येकाला कल्पकता वापरण्याचा अधिकार आहे. शेवटी मतदार सूज्ञ असतो” असं चंद्रकांतदादा म्हणाले.
संबंधित बातम्या:
‘शिवरायांना अभिवादन करताना योगींना आधी चप्पल काढायला शिकवा’, गुलाबराव पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला
हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार
‘शिवसेना सत्तेसाठी मिंधी, कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
एल्गारवर राष्ट्रवादीची भूमिका बदलतेय? आव्हाड म्हणतात, त्या वक्तव्याची चौकशी कराच!
(Chandrakant patil sends letter to yogi Adityanath to arrest sharjeel usmani)