BREAKING | शिवसेना पदाधिकाऱ्यावर मुंबईत गोळीबार, 22 वर्षीय तरुण अटकेत

विक्रोळी पूर्वेला असलेल्या टागोर नगर मधील साई मंदिर परिसरात सकाळी आठ वाजताच्या सुमारास शिवसेना पदाधिकारी चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, यामध्ये ते जखमी झाले आहेत.

BREAKING | शिवसेना पदाधिकाऱ्यावर मुंबईत गोळीबार, 22 वर्षीय तरुण अटकेत
Follow us
| Updated on: Dec 19, 2019 | 9:02 AM

मुंबई : मुंबईतील विक्रोळी भागात शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना (Mumbai Shivsena officer Firing) उघडकीस आली आहे. गोळीबारात चंद्रशेखर जाधव जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

विक्रोळी पूर्वेला असलेल्या टागोर नगर मधील साई मंदिर परिसरात आज (गुरुवारी) सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास हा हल्ला घडला. चंद्रशेखर जाधव यांच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली असल्याची माहिती आहे.

विक्रोळीतील गोदरेज रुग्णालयात जाधव यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जाधव यांच्यावर 22 वर्षीय तरुणाने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. हा तरुण मूळ अलाहाबाद (प्रयागराज)चा असल्याचं म्हटलं जातं.

हेडफोन उचलताना तोल गेला, पुण्यात 250 फूट दरीत पडून युवकाचा अंत

गेल्या काही दिवसापासून चंद्रशेखर जाधव यांना धमक्या येत असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

चंद्रशेखर जाधव हे शिवसेना उपविभागप्रमुख म्हणून गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत. भरसकाळी भरवस्तीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे विक्रोळीतील टागोर नगर परिसरात घबराट पसरली आहे.

या प्रकरणी विक्रोळी पोलिस घटनास्थळी पोहचले असून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली नाही.(Mumbai Shivsena officer Firing)

नागपूर महापौरांवरही गोळीबार

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. संदीप जोशी यांच्या गाडीवर बाईकस्वार हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. सुदैवाने जोशी आणि त्यांचं कुटुंब या हल्ल्यातून सुखरुप बचावलं.

पदभार स्वीकारल्यानंतर संदीप जोशी यांनी अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेमुळेच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, ठाकरे सरकारमध्ये गृह मंत्रालयाची धुरा शिवसेनेकडेच आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. आता शिंदेंना गुन्हेगारीवर वचक बसवण्यात यश येतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.