इथे ओशाळला मृत्यू, ‘कोरोना’च्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाने प्राण सोडले

हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाला 'कोरोना' झाल्याच्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला (Chembur Man gets heart attack neighbors deny help fearing Corona)

इथे ओशाळला मृत्यू, 'कोरोना'च्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाने प्राण सोडले
Follow us
| Updated on: Apr 13, 2020 | 2:49 PM

मुंबई : ‘कोरोना’च्या संकटकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन वारंवार केलं जात असलं, तरी मुंबईत असंवेदनशीलतेच कळस दाखवणारा प्रकार समोर आला आहे. हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाला ‘कोरोना’ झाल्याच्या संशयातून शेजाऱ्यांनी त्याला मदत नाकारली. त्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. (Chembur Man gets heart attack neighbors deny help fearing Corona)

चेंबूरमध्ये राहणाऱ्या समीर रविंद्र नासकर यांना 10 एप्रिल रोजी संध्याकाळी हृदयविकाराचा धक्का आला. घरात त्यांची पत्नी आणि मुलगी दोघीच होत्या. 61 वर्षीय पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी मायलेकींनी धावाधाव सुरु केली. शेजाऱ्यांची बेल दाबून त्यांनी मदतीची याचना केली.

नासकर यांना ‘कोरोना’ झाल्याच्या संशयातून शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णवाहिका येण्यास उशीर झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने समीर नासकर यांनी रुग्णालयात प्राण सोडले.

नासकर मायलेकींच्या दुर्दैवाचे दशावतार इथेच संपले नाहीत. समीर नासकर यांचा मृतदेह पुन्हा घरी आणण्यात आला. मात्र त्यानंतरही शेजाऱ्यांनी माणुसकी सोडली. कोरोनाच्या भीतीपोटी त्यांनी अंत्यसंस्काराला मदत करण्यास नकार दिला.

पित्याच्या निधनानंतर मायलेकीना शेजाऱ्यांनी वाऱ्यावर सोडलं. लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचे नातेवाईकही येऊ शकले नाहीत. अखेर पित्याच्या मृतदेहाला आई सविता नासकर आणि मुलगी मोनिका नासकर यांनीच एक किलोमीटरपर्यंत खांदा दिला.

(Chembur Man gets heart attack neighbors deny help fearing Corona)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.