छगन भुजबळ हे फडणवीस यांचा माणूस आहे का?; देवेंद्र फडणवीस यांचं एका वाक्यात उत्तर काय?

मराठा आंदोलन सुरू असताना ओबीसी आंदोलनात छगन भुजबळ उतरले होते. त्यामुळे भुजबळ हे फडणवीस यांचा माणूस असल्याची चर्चा होती. यावर टीव्ही9 मराठीच्या 'लोकसभा महासंग्राम' कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले आहेत.

छगन भुजबळ हे फडणवीस यांचा माणूस आहे का?; देवेंद्र फडणवीस यांचं एका वाक्यात उत्तर काय?
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 7:40 PM

मुंबई : टीव्ही9 मराठीच्या ‘लोकसभा महासंग्राम’ या विशेष कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीसांना मनोज जरांंगे पाटील, लोकसभा जागावाटप, 2019 निवडणुकीतील विश्वासघात अनेक मुद्द्यांवर दिलखुलासपणे उत्तरे दिलीत. मराठा समाजाचं आंदोलन सुरू असताना ओबीसी समाजानेही आंदोलन केलं होतं. छगन भुजबळ ओबीसी समाजाकडून उभे होते. यादरम्यान भुजबळ हे फडणवीस यांचा माणूस असल्याची चर्चा झाली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

भुजबळ कुणाचा माणूस म्हणता येईल का. मी 1989 राजकारणात आलो ते 85मध्ये मुंबईचे महापौर होते. काही बाबतीत भुजबळांचा इतिहास पाहिला तर भुजबळांचं शिवसेनेसोबत भांडण का झालं? शिवसेनेला मंडल आयोग मान्य नव्हतं. मंडल आयोगासाठी त्यांनी शिवसेना सोडली. ते काँग्रेससोबत गेले. मीही माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून मी ओबीसींच्या बाजूने आहे. माझं ठाम मत आहे की सामाजिक न्याय करायचा असेल तर जसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना न्याय दिल्याशिवाय सामाजिक न्याय होऊ शकत नाही. तसंच ओबीसींना न्याय दिल्याशिवाय सामाजिक न्याय होऊ शकत नसल्याचं देवेंद्र फडणवीस  म्हणाले.

आजही तुम्ही बघा ओबीसीतील बारा बलुतेदारांची अवस्था पाहा. त्यातील छोट्या जातींची अवस्था पाहा. त्यांची अवस्था आणि अनुसूचित जातीतील लोकात फार थोडा फरक आहे.  महाराष्ट्रात नॉन क्रिमिलियरसाठी संघर्ष केला. क्रिमिलियरची मर्यादा8 लाखावरून अडीच लाख केली. मी संघर्ष करून ती वाढवून घेतली. भुजबळ आणि माझ्यात हेच समानता आहे ते म्हणजे प्रो ओबीसी राहिलो. ओबीसींच्या बाजूने राहिलो म्हणजे मी अँटी मराठा नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

मराठ्यांना ओबीसीत टाकले असते तर मनभेद झाले असते. आरक्षण वाढले नसते. जेवढे ओबीसी आरक्षणात आहेत, तेवढेच मराठा ओबीसी आरक्षणात आले असते. कुणाच्याच वाट्याला काही आलं नसतं. जे मायक्रो ओबीसी आहेत, ओबीसीतील मोठे घटक आणि मराठा समाज यांना फायदा झाला असता. पण छोट्या ओबीसी घटकांना त्या ओबीसीतील 300 छोट्या जाती आहेत. त्यांना न्याय मिळाला नसता. सामाजिक न्याय देण्याऐवजी सामाजिक अन्याय झाला असता. हा कॉन्शस निर्णय होता. ओबीसींनाही न्याय दिला पाहिजे आणि मराठा समाजालाही न्याय दिला पाहिजे, असा न्याय तत्त्वावर न्याय दिला असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.