Chhagan Bhujbal : झोपडपट्टीत ओबीसी मोठ्या संख्येने मग लोकसंख्या कमी कशी?; भुजबळ मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिणार

Chhagan Bhujbal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी नाकारण्यात आली. त्यावर भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री नसतील तर उपमुख्यमंत्र्यांना बोलायला द्यायला हवं होतं.

Chhagan Bhujbal : झोपडपट्टीत ओबीसी मोठ्या संख्येने मग लोकसंख्या कमी कशी?; भुजबळ मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिणार
भुजबळ मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिणार Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 3:34 PM

मुंबई: ओबीसी आरक्षणासाठी (obc reservation) मागच्या काही दिवसात सॉफ्टवेअरमध्ये जी नावं फिड करण्यात आली. ती विशिष्ट जातीची असल्याचं दिसून आलं आहे. परंतु, एकच आडनाव अनेक जातीत असतं. त्यामुळे अशा पद्धतीने डेटा भरल्यास सॉफ्टवेअरमध्ये चुकीची माहिती फिड होणार आहे. त्यामुळे अडचण निर्माण होणार आहे. आमचं म्हणणं आहे की मतदान ओळखपत्र घ्या आणि त्याआधारे माहिती गोळा करा. परंतु तसं करण्यात आलं नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाची (reservation) कत्तल होईल अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी सांगितलं. मोठया शहरात पाच टक्के आणि सहा टक्के ओबीसी आहेत, असं जमा करण्यात आलेला डेटा सांगतो. असं कसं असू शकतं? झोपडपट्टीत राहणारे एक तर दलित आहेत किंवा ओबीसी आहेत. मग तरी लोकसंख्या कमी कशी काय?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

छगन भुजबळ हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते. ओबीसींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले आहेत ते यंत्रणेने तपासून घ्यायला हवेत, असं भुजबळ यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधींची चौकशी हे दुर्देव

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रोज विरोधी पक्षाच्या नेत्यांवर धाडी सुरू आहेत. हे रोजचं झालं आहे. राहुल गांधी यांना तीन दिवस सलग चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. देशासाठी ज्यांनी जीवन अर्पण केलं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे हे दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले.

विचारधारा सोडायला सांगितलं नाही

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरहबी त्यांनी भाष्य केलं. आम्हीं एकत्र आलो त्यावेळी त्यांनी आपआपली विचारधारा सोडा असं आम्हीं बोललो नाही. त्यामुळें कोणी कुठं जायचं तो त्यांचा अधिकर आहे, असं ते म्हणाले.

राजभवनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी नाकारण्यात आली. त्यावर भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री नसतील तर उपमुख्यमंत्र्यांना बोलायला द्यायला हवं होतं. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना त्याच स्टेजवर बोलायला देता आणि उपमुख्यमंत्राना बोलायला देत नाही हे योग्य नाहीं. कालचा राजभवनच्या कार्यक्रमात कोणा मंत्र्याला बोलावलंच नव्हतं. कार्यक्रम आम्ही केलेल्या कामाचा आणि आम्हाला निमंत्रण नाही. हे योग्य नाही. मी याबाबात विचारणा केली. परंतु त्यांच्याकडून कोणताच रिप्लाय आला नाही. मी इतर मंत्र्यांना देखील विचारलं, परंतु त्यांना देखील निमंत्रण नव्हतं. मात्र दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची मोठी गर्दी त्याठिकाणी होती, असं ते म्हणाले.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....