छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी, विकिपीडियाची आता बोबडी वळली, सायबर पोलिसांनी अशी काढली खुमखुमी
Chhatrapati Sambhaji Maharaj Wikipedia : बखरकारांनी आणि काही तथाकथित इतिहासकारांनी स्वत:च्या फायद्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. त्यांचे उद्योग उघडे पडले. तसाच उद्योग विकिपीडियावर उपटसुंभांनी केला. आता त्यांना धडा बसणार आहे.

बखरकारांनी पोटशूळ उठून तर काही कथित इतिहासकारांनी पुस्तक खपावे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केले. त्यांचे हे उद्योग उघड्यावर पडल्याने तेच आता बदनामीच्या दलदलीत माखले आहेत. तसाच उद्योग माहितीचा स्त्रोत म्हणून लोकप्रिय असणाऱ्या विकिपीडियावर करण्यात आले. याविषयीची बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन तातडीने त्याची दखल घेतली आणि योग्य कारवाईचे निर्देश दिले. सायबर सेलने अनेकदा मेल पाठवून विकिपीडियाला समज दिली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
‘छावा’ चे प्रखर तेज पसरले
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे सुसंस्कृत, विद्वान आणि महान योद्धे होते. त्यांना जवळपास 13 हून अधिक भाषांचे ज्ञान अवगत होते. ते शास्त्र आणि शस्त्र पारंगत होते. बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी लिहिला. इतर ही स्फुट साहित्याचा उल्लेख करण्यात येतो. स्वराज्यासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. ते अजरामर झाले. पण त्यानंतर काही बखरकारांनी आणि कथित इतिहासकारांनी असूयेपोटी त्यांचा बदनामीचा प्रयत्न केला. पण अनेक इतिहासकारांनी अस्सल दाखल्यासह त्यांचे कर्तृत्व समोर आणले. छावाचे प्रखर तेज आज सगळीकडे पसरले आहे.




विकिपीडियावरील लेखकांवर गुन्हा
विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण टाकणाऱ्या लेखकांवर गुन्हा दाखल होणार आहे. समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण विकिपीडियावर अपलोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. विकिपीडियाला हा कंटेंट हटवण्यासाठी तीन दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र विकिपीडियाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.
महाराष्ट्र सायबर सेल विकिपीडियावर असलेलेल्या कंटेंटसंदर्भात चार ते पाच लोकांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. विकिपीडिया हा एक ओपन फ्लॅटफॉर्म आहे. तिथे काही ठराविक लोकांना स्वत:चे लिखाण अपलोड करण्याची मुभा आहे.
विकिपीडियावर संभाजी महाराजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणारे अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने विकिपीडियाच्या ४ ते ५ एडिटर्सवर गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलने जवळपास १० ते १५ ईमेल विकिपीडियाला केले होते. एकही ईमेलला विकिपीडियाने उत्तर दिले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र सायबर सेल सबंधित लेखकांवर गुन्हा दाखल करत आहे.