श्रावण संपताच महागाईची फोडणी; चिकन 10 रुपयांनी तर अंडी एक रुपयांनी महागली

श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच खवय्यांना महागाईची फोडणी बसली आहे. खवय्यांनी मांसहार सुरू केल्याने अंडी आणि चिकनच्या दरात वाढ झाली आहे. (Chicken prices soar high, retail at more than Rs 140 per kg)

श्रावण संपताच महागाईची फोडणी; चिकन 10 रुपयांनी तर अंडी एक रुपयांनी महागली
chicken eggs
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 10:21 AM

मुंबई: श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच खवय्यांना महागाईची फोडणी बसली आहे. खवय्यांनी मांसहार सुरू केल्याने अंडी आणि चिकनच्या दरात वाढ झाली आहे. चिकनच्या दरात 10 तर अंडी एक रुपयांनी महागले आहे. (Chicken prices soar high, retail at more than Rs 140 per kg)

श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच चिकन आणि अंड्यांचे भाव वधारले आहेत. सोयाबीन आणि मका महागल्याने मासांहार सेवनाकडे वळल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांत कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. ब्रॉयलर आणि गावठी कोंबडीच्या दरात प्रति किलोमागे 10 रुपयांनी तर, अंड्याच्या दरात प्रति नग 1 रुपयाने वाढ झाली आहे.

आताचे दर किती?

ब्रॉयलर कोंबडी आधी 120 रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी 430 रुपये प्रति किलोने आणि अंडी प्रति नग पाच रुपये दराने विक्री केले जात होते. आता ब्रॉयलर कोंबडी 140 ते 150 रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी 440 ते 460 रुपये प्रति किलोने तसेच अंडी प्रति नग 6 रुपये दराने विक्री केले जात आहेत…

गॅस सिलिंडर महागला

कोरोनाच्या संकटानं सामान्यांचं जगणं हैराण केलंय. गेल्या दोन वर्षांत झालेल्या टाळेबंदीनं अनेकांच्या हातचे रोजगार हिरावले गेले. हजारो कुटुंब आर्थिक संकटाच्या खाईत लोटली गेली. आता पुन्हा तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळं पुन्हा लॉकडाऊन होणार का, याची धास्ती अनेकांनाय. यात पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या वाढलेल्या दरानं सामान्यांना हैराण केलंय. त्यातच 1 सप्टेंबरपासून स्वयंपाकाच्या गॅसचे दर महागल्यानं सामान्यांचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलंय. या वर्षी 1 जानेवारीपासून आतापर्यंत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर तब्बल 190 रुपयांनी वाढलेत. विशेष म्हणजे 1 मार्च 2014 पासून तब्बल 478 रुपयांची ही वाढय. 1 मार्च 2014 रोजी हे दर 410 रुपये 50 पैसे होते.

महिन्यातून दोनदा दरवाढ

प्रत्येक महिन्याच्या एक आणि पंधरा तारखेनंतर गॅस दरवाढीचं धोरणं तेल कंपन्यांनी स्वीकारलंय. गेल्या महिन्यात स्वयंपाकाच्या गॅसचे दर दोनदा वाढले. प्रत्येक वेळेस 25 रुपये म्हणजे 50 रुपयांची वाढ झाली. विशेष म्हणजे जुलै महिन्यात 25.50 आणि मार्च महिन्यातही 25 रुपयांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ झालीय.

व्यावसायिकांनाही फटका

गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका व्यावसायिकांनही बसलाय. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर 1 सप्टेंबरपासून 73 रुपयांनी वाढलेत. त्यामुळे एका सिलिंडरसाठी व्यावसायिकांना तब्बल 1703 रुपये मोजावे लागतायत. आधीच कोरोना टाळेबंदीनं हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. आत्ता कुठं सारं सुरळीत सुरू असताना ही दरवााढ झाल्यानं व्यावसायिकांमध्ये संतापाची भावनाय.

अनुदान अचानक बंद

देशात मे 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेचा कहर सुरू होता. सामान्य एकीकडं जीवाच्या भीतीनं घरात होता. याच काळात अनेकांचा व्यवसाय गाळात गेला. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक जणांनी खिशात पैसे नसल्यानं आणि दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्यानं चक्क पायी गाव गाठला. या काळात वर्षाला बारा घरगुती गॅस सिलिंडर अनुदानित दरानं देण्याचं धोरण सरकारनं अचानक बंद केलं. याबाबतही सामान्यांतून संताप व्यक्त होतोय. (Chicken prices soar high, retail at more than Rs 140 per kg)

संबंधित बातम्या:

2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, चंद्रकातदादांची धमकी, ‘फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढू’ पटोलेंचं प्रत्युत्तर

शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, उद्धव ठाकरेंचा बिनीचा शिलेदार आक्रमक

मुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला, ती पहिलीच वेळ असावी : संजय राठोड

(Chicken prices soar high, retail at more than Rs 140 per kg)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.