राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची नाही, किशोरी पेडणेकर असं का म्हणाल्या

आम्ही संयमानी जाणार. या स्टाईलनं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू द्यायची नाही.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची नाही, किशोरी पेडणेकर असं का म्हणाल्या
किशोरी पेडणेकरImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 3:24 PM

मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर आयुक्तांवर दबाव टाकत असल्याचा आरोप केलाय. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ऋतुजा लटके यांची उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर बांधिलकी आहे. ऋतुजा लटके यांनी राजीनाम्याच्या नियमानुसार एक पगार भरला पाहिजे. तो त्यांनी भरला. पण, मिलिंद सावंत, आयुक्त यांना कामं करायची नसेल तर चले जावं.

ऋतुजा लटके या स्वखुशीनं राजीनामा देतात. त्यांचा राजीनामा का दाबून ठेवता, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला. बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय, असं म्हणता. बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे हा ब्रँड आहे, असंही त्यांनी शिंदे गटाला ठणकावून सांगितलं.

शंभर टक्के शिंदे, फडणवीस त्यांच्यावर दबाव आणतेय. सनदी अधिकारी हे नेहमी नियमानं काम करतात. पण, इकबाल चहल हे त्यांना घाबरतात. ते त्यांना घाबरवतात. नियमांची पायमल्ली करतात.

राज्यात चार महिन्यात बघीतलं. जे जे आमदार विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. दादागिरीचा वापर करतात, तिथं त्यांच्यावर केसेस नाही. हातपाय तोडा, टेबल जामीन करीन. एक आमदार भर वस्तीत स्वतः संरक्षणासाठीची गन वापरतो. आरोग्यमंत्री म्हणतो, मला कोण भिकारी करेल. मी महाराष्ट्राला भिकारी करेन. तरी त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाही, असा सवाल त्यांनी केला.

नियमानं चाललं पाहिजे. नीट वागलं पाहिजे. बोललं पाहिजे. नेतृत्व संयमी, सुसंस्कृत आहे. हे आमच्या नेतृत्त्वानं सिद्ध केलंय. पण, आयुक्तांवर दबाव टाकला जातो. तसा दबाव ऋतुजा लटके यांच्यावर दबाव टाकला जात आहे का. मला माहीत नाही.

ऋतुजा लटके या रमेश लटकेंच्या पत्नी आहेत. त्यांच्या घरातील बाळकडू हे उद्धवजींच्या वडिलांनी दिलेलं बाळकडू आहे. त्यामुळं ते शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर राहतील, अशी अपेक्षा किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

कोर्टात जावं लागेल. कोर्टानं तोंड फोडलं की मग महापालिका जागी होती. जे काही आहे ते भरलं तुम्ही देणार नाही. याचा अर्थ एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारच्या जोर, जबरजस्तीला बळी पडतात, असा आरोपही पेडणेकर यांनी लावला.

भुर्जी पटले यांचा अर्धा प्रचार झाला. आम्ही कुठलाही कायदा हातात घ्यायला जाणार नाही. आम्ही संयमानी जाणार. या स्टाईलनं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू द्यायची नाही. शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा पक्ष करू शकत नाही, असंही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.