अब्दुल सत्तारांना लास्ट वॉर्निंग, तुम्ही माध्यमांना प्रतिक्रियाच देऊ नका…
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच थेट लास्ट वॉर्निंग दिली आहे.
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अनेक ठिकाणी आंदोलन करुन त्यांच्या राजीनाम्याची मागण केली जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता वाटत असल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच अब्दुल सत्तार यांची कानउघडणी करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेसह इतर पक्षांनीही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची कानउघडणी करत तुम्ही माध्यमांना कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षासह त्यांनी स्वत:ला अडचणी आणले होते. त्यामुळे पक्षाची बदनामी आणि होणारी टीका टाळण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आता लास्ट वॉर्निंगच दिली आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त टीका केल्यानंतर शिंदे गटासह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली आहे.
त्यामुळेच आता मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांपासून लांब राहण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांनी माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये अशीही सूचना करण्यात आली आहे.
त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी पुन्हा काही वादग्रस्त वक्तव्य केले किंवा कोणत्याही वादात अडकले तर मात्र त्यांचे मंत्रिपदही धोक्यात येऊ शकते असेही यावेळी सांगण्यात आले आहे.