सर्वात मोठी बातमी | मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस-पवार अयोध्येला जाणार नाहीत? नेमकं काय कारण

अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. मुख्यमंत्र्यांनीही सूचक ट्विट करत याबाबत माहिती दिलीये. नेमकं काय कारण जाणून घ्या.

सर्वात मोठी बातमी | मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस-पवार अयोध्येला जाणार नाहीत? नेमकं काय कारण
ajit pawar, eknath shinde and devendra fadnavisImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 11:15 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अयोध्येला जाणार नसल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील एकही मंत्री उपस्थित असणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूचक ट्विट करत माहिती दिली आहे.

मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे यांनी आजपासून मुंबईकडे येण्यासाठी सुरूवात केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण विषय आणि जरांगे पाटील मुंबईत येत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी तसं सूचक ट्विटही केलं आहे.

एकनाथ शिंदेंचं ट्विट-

अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासियांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे 26 जानेवारीला मुंबईमध्ये येणार आहेत. आज 20 जानेवारीला मुंबईकडे मराठा आंदोलक निघाले आहेत. मनोज जरांगे यांनी सर्व मराठा समाजाला आपल्यासोबत आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान,  मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांसह मुंबईत येणार असल्यानेच तर मुख्यमंत्र्यांनी अयोध्येतील जाणं रद्द केलं का? यावर आता एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.