“कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार”; जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..

मागच्या सरकारने सरकार अल्प मतात आल्यावर घाई घाई ने हे निर्णय घेतला होता, पण त्या नंतर अधिकृतपणे आपण त्याला परवानगी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार; जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 6:44 PM

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पहिल्यांदाच या ठिकाणी जयंती होते आहे. त्यामुळे त्याचा हा आनंद मोठा आहे. संभाजी महाराज यांची आज 366 वी जयंती होत असतानाच आजच्या या ठिकाणी अविस्मरणीय सोहळा पार पडत आहे त्याचाही आनंद वेगळा असल्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे. त्यांनी घोषणा केल्यानंतर उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, या ठिकाणी अनेक लोकांनी संभाजी महाराज यांना हरवण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र त्यांच्या शौर्याविषयी काही इतिहासकरांनी काही वेगळं लिहिलं असेल पण ती वस्तूस्थिती नाही असंही एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले.

शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रचला आणि संभाजी महाराज यांनी त्याला कळस चढावला आहे.छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक पराक्रम त्यांनी या ठिकाणी त्यांनी केले आहेत. त्यामुळे त्यांच्या शौर्याच्या आठवण आपण जतन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

त्यांनी मुघल साम्राज्याबरोबर लढा दिला, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 120 लढाई लढल्या होत्या, मात्र त्यांचा कधीही पराभव झाला नाही. भविष्यातील आखणी करून त्यांनी जगात कुठे नसतील असे जलदुर्ग या ठिकाणी उभारले गेले आहे.

त्यामुळे या ठिकाणी हीच प्रेरणा घेऊन नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नौदलाच्या झेंड्यावर राजमुद्राला स्थान दिलेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या ठिकाणी होणारा नौदलाचा दिन आता सिंधुदुर्ग येथील जलदुर्गात होणार आहे.तसेच आपण औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते, त्यामुळे सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रथम तो निर्णय घेतला असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मागच्या सरकारने सरकार अल्प मतात आल्यावर घाई घाई ने हे निर्णय घेतला होता, पण त्या नंतर अधिकृतपणे आपण त्याला परवानगी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

औरंगाजेबाने या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांना प्रचंड त्रास दिला होता, त्यांनी त्यांनी धर्म बदलायला सांगितला होता. मात्र त्यांनी त्यांना जुगारले नाही.

या ठिकाणी जो कोस्टल रोड होणार आहे त्या रोडला आता छत्रपती संभाजी महाराज हे नाव देणार आहोत. याच कोस्टल हायवेच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार असा पुतळा उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.